काल लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालांमागच्या काही अजब कहाण्या आता समोर आल्या आहेत. त्यात तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या पक्षाने फिल्मी स्टाईलमध्ये मिळवलेलं यश चर्चेचा विषय ठरलेलं आहेत. याच तामिळनाडूतील एका कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. हे तिघेही जण लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. विजयी झालेल्यांमध्ये मार्टिन यांची पत्नी, मुलगा आणि जावयाचा समावेश आहे. यापैकी दोघे तामिळनाडूतून तर एक जण पाँडेचेरीतून विजयी झाला आहे.
लॉटरी किंग आणि इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून मोठ्या राजकीय देणग्या देणारे तामिळनाडूमधील चर्चित राजकीय देणगीदार असलेले सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लिमारोज मार्टिन यांनी तामिळनाडूतील लालगुडी येथून एआयएडीएमके पक्षाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. तर विक्कीवाक्कम येथून जावई आधव अर्जुन याने अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाकडून निवडणूक जिंकली. टीव्हीकेचा सरसिटणीस असलेल्या आधव अर्जुन याने डीएमकेच्या कार्तिक मोहन यांचा १७ हजार ३०२ मतांनी पराभव केला.
तसेच सँटियागो मार्टिन यांचा मुलगा जोस चार्ल्स मार्टिन याने पाँडेचेरीमधील कामराज नाहर येथून निवडणूक लढवून विजय मिळवला. जोस चार्ल्स मार्टिन याने लचिया जननायक काची (एलजेके) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्याने काँग्रेस आणि टीव्हीकेच्या उमेदवारांचा पराभव केला.
Web Summary : In Tamil Nadu, three family members of lottery king Santiago Martin won elections from three different parties. Martin's wife won from AIADMK, his son from LJK in Pondicherry, and his son-in-law from TVK.
Web Summary : तमिलनाडु में, लॉटरी किंग सैंटियागो मार्टिन के परिवार के तीन सदस्यों ने तीन अलग-अलग पार्टियों से चुनाव जीते। मार्टिन की पत्नी ने AIADMK से, बेटे ने पांडिचेरी में LJK से और दामाद ने TVK से जीत हासिल की।