शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:49 IST

Madhya Pradesh News: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे बांधण्यात आलेला काटकोनात बांधलेला  फ्लायओव्हर चर्चेत आला होता. तसेच या फ्लायओव्हरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर आता याच  भोपाळमधील ऐशबाग येथे  महानगरपालिकेने बांधलेलं एक  शौचालय  चर्चेत  आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे बांधण्यात आलेला काटकोनात बांधलेला  फ्लायओव्हर चर्चेत आला होता. तसेच या फ्लायओव्हरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर आता याच  भोपाळमधील ऐशबाग येथे  महानगरपालिकेने बांधलेलं एक  शौचालय  चर्चेत  आलं आहे.  येथील कुप्रसिद्ध  ९० डिग्रीच्या पुलाजवळच वॉर्ड क्रमांक  ४० येथे महानगपालिकेने रेल्वेच्या जमिनीवर एक सुलभ शौचालय  बांधलं आहे. या सुलभ शौचालयाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाच रेल्वेने आपल्या जमिनीच्या सीमेवरून संरक्षक  भिंत  बांधली. त्यामुळे हे शौचालय या भिंतीच्या मागे गेले. तसेच आता लोकांना त्याचा वापर करता येणार नाही.

जेव्हा या सुलभ शौचालयाचं बांधकाम केलं जात होतं तेव्हा स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेकडे आक्षेपही नोंदवला होता. तसेच ही रेल्वेची जमीन असल्याने तिथे शौचालयाचं बांधकाम करू नका, असे सांगितले होते. मात्र रेल्वेच्या  अधिकाऱ्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तसेच रेल्वेच्या जमिनीवर शौचालय बांधले. मात्र हे शौचालय बांधून पूर्ण होत असतानाच रेल्वेने  आपल्या जमिनीच्या सीमेवरून संरक्षक भिंत बांधली. 

 रेल्वेने संरक्षक भिंत  बांधल्याने रेल्वेच्या हद्दीत महानगरपालिकेने बांधलेल्या शौचालयासाठी झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. तसेच महानगरपालिकेच्या या कारभाराबाबत आता स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात  आहे. तसेच आता  या शौचालयाचा वापर करण्यासाठी महानगरपालिकेने आता फ्लायओव्हर बांधून द्यावा, असा खोचक  सल्ला दिला  जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bhopal Municipality Builds Toilet, Needs Flyover for Access!

Web Summary : Bhopal municipality built a toilet on railway land, ignoring resident concerns. Now, a newly constructed wall blocks access, rendering the facility unusable. Locals sarcastically suggest building a flyover for toilet access, highlighting the municipality's blunder.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMunicipal Corporationनगर पालिकाIndian Railwayभारतीय रेल्वे