1 / 7Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. 2 / 7'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने ४ दिवसांतच ३९ कोटींचा बिजनेस केला आहे. 3 / 7रितेश देशमुखचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाचा सीक्वल येणार का? अशी विचारणा सगळीकडे होत आहे. 4 / 7'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेशने नागपूरमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्याने सिनेमाच्या सीक्वलबाबत भाष्य केलं. 5 / 7रितेश म्हणाला, 'सध्या या सिनेमाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजून खूप छान प्रतिसाद मिळाला तर ती नंतरची गोष्ट आहे'. 6 / 7'पण, सध्या तरी या सिनेमाचा हा एकच भाग आहे', असं म्हणत रितेशने स्पष्टीकरण दिलं आहे.7 / 7'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.