उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक लग्नाची घटना समोर आली आहे. इथे एकाच तरुणीने दोन जुळ्या भावांशी एकाच वेळी लग्न केले आहे. या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये या लग्नाच्या कायदेशीर आणि सामाजिक वैधतेवरून मोठी चर्चा रंगली आहे.
लहानपणापासूनची जिद्द ठरली लग्नाचे कारण?मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही नवरदेव सख्खे जुळे भाऊ आहेत. लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट मिळून करण्याची आणि एकमेकांपासून वेगळे न होण्याची या भावांची जिद्द होती. हीच जिद्द त्यांनी लग्नाच्या बाबतीतही कायम ठेवली. एकाच मुलीशी लग्न करण्याच्या त्यांच्या मागणीपुढे कुटुंबीयांनीही हार मानली आणि हा विवाह पार पडला.
नवरीच्या चेहऱ्यावर उदासी...व्हायरल व्हिडिओमध्ये जयमालेच्या वेळी एका नवरीच्या गळ्यात दोन नवरदेवांनी माळ घातल्याचे दिसत आहे. यावेळी दोन्ही भाऊ आनंदी दिसत असले, तरी नवरीच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. यामुळेच सोशल मीडियावर अनेकांनी या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा विवाह नवरीच्या संमतीने झाला आहे की तिच्यावर दबाव टाकण्यात आला, असा प्रश्न विचारला जात आहे.
कायदेशीर अडचण येऊ शकते?भारतीय कायद्यानुसार, एका व्यक्तीला एकाच वेळी दोन पती किंवा दोन पत्नी असणे बेकायदेशीर आहे. या विवाहाची नोंदणी करणे कठीण असून, भविष्यात या तिघांनाही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Web Summary : A woman married twin brothers in Uttar Pradesh, sparking controversy. The bride's apparent unhappiness raises concerns about consent. Legally, the marriage faces challenges under Indian law.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक महिला ने जुड़वां भाइयों से शादी कर ली, जिससे विवाद पैदा हो गया। दुल्हन की स्पष्ट नाखुशी सहमति के बारे में चिंता पैदा करती है। कानूनी तौर पर, भारतीय कानून के तहत शादी को चुनौतियों का सामना करना पड़ता है।