शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:22 IST

Assembly Election 2026 Result : आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या  राज्यांत विधानसभाव निवडणुकीचे एकतर्फी निकाल लागले असले तरी काही मतदारसंघात मात्र  टी-२० क्रिकेट सामन्याला लाजवेल असा थरार  रंगला. त्यात एका मतदारसंघात तर अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाला.

देशभरातील राजकीय वर्तुळाचे  लक्ष  लागून  असलेल्या पाच  राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. यात पश्चिम  बंगाल आणि तामिळनाडूमधील  निकालांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या  राज्यांत विधानसभाव निवडणुकीचे एकतर्फी निकाल लागले असले तरी काही मतदारसंघात मात्र  टी-२० क्रिकेट सामन्याला लाजवेल असा थरार  रंगला. त्यात एका मतदारसंघात तर अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाला.

ही अटीतटीची लढत झाली ती  तामिळनाडूमध्ये. येथे ऐतिहासिक यश  मिळवणाऱ्या विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक प्रस्थापित पक्षांना धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. येथीलच तिरुप्पूर  मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत रंगली. या विधानसभा मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार सिनिवास सेतुपती  आर यांनी डीएमकेच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात केली.

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत टीव्हीकेच्या सिनिवास सेतुपती आर यांना ८३  हजार ३७५ मते मिळाली. तर  त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डीएमकेचे पेरियाकरुपन  यांना ८३ हजार ३७४  मते मिळाली. अशा प्रकारे सिनिवास सेतुपती यांनी अवघ्या  एका मताने बाजी मारली. येथे भाजपाचे उमेदवार असलेले थिरुमरन के. सी. हे २९ हजार ५४ मते  घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

इतर राज्यांमधील कमी फरकाने  झालेल्या  लढतींचा विचार केल्यास केरळमधील मनालूर  विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सी. रवींद्रनाथ यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर १२६ मतांनी मात केली. आसाममध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम आसाम गण परिषदेचे प्रकाशचंद्र दास यांनी केला. त्यांनी सुआलकुची मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला  ७२४ मतांनी पराभूत केले.  

तर  पश्चिम बंगालमध्ये राजारहाट न्यू टाऊन मतदारसंघात  सर्वात अटीतटीची लढत झाली.  या  लढतीत तृणमूल काँग्रेसचे तापश चटर्जी यांनी भाजपाच्या उमेदवाराला केवळ ३२३ मतांनी पराभूत केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nail-biting Finish: One Vote Decides Winner in Tamil Nadu!

Web Summary : Tamil Nadu saw a dramatic win by TVK candidate, decided by a single vote. Other states also witnessed close contests, with narrow victories in Kerala, Assam and West Bengal.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलापती विजय