लखनौच्या ताफ्यातून अक्षत रघुवंशी या युवा बॅटरनं मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारत खास विक्रमाला गवसणी घातली. IPL पदार्पणात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो वैभव सूर्यवंशी याच्यानंतर ११ वा फलंदाज ठरला आहे.
२०२५ च्या हंगामात अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पणाचा सामना खेळताना वैभव सूर्यवंशी याने लखनौ विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. असा पराक्रम करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.
सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणारा समीर रिझवी या युवा भारतीय फलंदाजाने २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून IPL पदार्पण करताना राशिद खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून मैफील लुटली होती.
श्रीलंकन महेश तीक्षणा हा देखील या यादीत आहे. २०२२ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून RCB विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.
सिद्धेश लाड याने २०१९ मध्ये MI कडून पदार्पणाचा सामना खेळताना पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारत लक्षवेधून घेतलं होते.
वेस्ट इंडिजचा पॉवर-हिटर जावोन रॅमन सेर्ल्सने २०१८ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पंजाब किंग्स विरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.
जलगती गोलंदाज अनिकेत चौधरी याने २०१७ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारत सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले होते.
कार्लोस ब्रॅथवेट याने २०१६ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून कोलकाता विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना षटकार मारून धमाकेदार अंदाजात आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.
KKR च्या ताफ्यातून IPL मध्ये आपली खास ओळख निर्माण करणारा मसल पॉवर आंद्रे रसेल याने २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले. RCB विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत धमाकेदार अंदाजात आपल्या IPL कारकिर्दीची सुरुवात केली होती.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू केव्हॉन कूपर याने २०१२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पंजाबविरुद्ध IPL पदार्पण करताना षटकारासह खाते उघडले होते.
ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज रॉब क्विनी हा IPL च्या इतिहासातील असा पहिला पहिला फलंदाज आहे ज्याने षटकारासह IPL मध्ये एन्ट्री मारली. २००९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करताना हा पराक्रम करून दाखवला होता.