शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:41 IST

1 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण बाप्पाच्या कृपेने यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. काही प्रमाणत ताण किंवा दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. मनाने भक्कम राहून पुढची वाटचाल केली तर काही प्रमाणात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोके, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या.
2 / 10
बाप्पाच्या कृपेने हा सप्ताह तुमच्यासाठी निवांत वेळ घेऊन येत आहे. तुमच्या आवडीचं काहीतरी करु शकाल. एखादा आनंदाचा कार्यक्रम होईल. मागे केलेल्या कष्टाचे फळ काही प्रमाणात मिळेल. लहानसा उत्सव साजरा कराल. समारंभामध्ये सहभागी व्हाल किंवा तुम्ही स्वतः तुमच्या आवडीच्या लोकांशी भेटी होतील. एकमेकांना सहाय्य कराल. या आठवडयात तुम्ही मन मोकळे हसा आणि मन मोकळे बोला. तुमच्या जवळच्या माणसांशी आवर्जून संवाद साधा. स्वार्थबुद्धी सोडा.
3 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा आहे. कष्टाचे हवे तसे फळ मिळणे थोडे कठीण आहे. विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल आणि बाप्पाच्या कृपेने नवीन मार्ग सापडेल! परिस्थितीचा स्वीकार करुन आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. या आठवड्यात तुम्ही आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका, त्या पूर्ण होणार नाहीत. भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा.
4 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला मजबूत ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल! या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. बाप्पाचे नाव घेत ध्यान, मेडीटेशन, प्रार्थना करा.
5 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. बरेच कष्ट करावे लागतील. कसली तरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. पण या सगळ्यातूनच 'आजची रात्र ही उद्याच्या पहाटेची चाहूल घेऊन येते' याचा अनुभव तुम्हाला येईल. या आठवड्यात तुम्ही स्वतः संयम ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळा. परोपकार करण्याचा प्रयत्न करा. अंगारकीच्या मुहूर्तावर गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा!
6 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा विरंगुळा मिळण्याचा असणार आहे. तुम्ही पूर्वी श्रम केले आहेत, बाप्पाच्या कृपेने आता या आठवड्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल तुम्ही भौतिक सुखात आरामात असाल. या आठवड्यात तुम्ही काळजी सोडून आनंद घेण्याची गरज आहे. हा वेळ स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. कसलाही दिखावेपणा करू नका!
7 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी धड इकडे नाही आणि तिकडे ही नाही अशी परिस्थिती निर्माण करणारा आहे. दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही बाप्पाच्या कृपेने तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात. या आठवड्यात तुम्ही आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. दडपण न घेता 'यालाच जीवन ऐसे नाव' समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.
8 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. बाप्पाच्या कृपेने काम पूर्णत्वास जाऊ शकते. अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अडथळे दूर होतील, त्यांना पार करण्याची शक्ती तुमच्याकडे असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आवाज लोकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. परिस्थितीशी दोन हात करा. आत्मविश्वास ठेवा फक्त त्याचा अतिरेक नको! पुढे होऊन नेतृत्व करा. बदल घडण्याची वाट बघू नका, तो स्वतः घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा!
9 / 10
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुष्कळ घडामोडी पटापट घडण्याचा हा काळ असणार आहे. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते पण तुमचे संयम आणि धैर्य तुम्हाला यातून तारून नेईल! कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, धीराने सामोरे जायचे आहे. लहानसहान भांडणे विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या, कचरा टाकून द्या. बाप्पाचे नाव घ्या आणि बदलत्या गोष्टींत सहभागी व्हा.
10 / 10
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता. ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिष