Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:47 IST

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि 'बेबो' करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येणार?

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि 'बेबो' करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. 'बॉडीगार्ड' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर, तब्बल ११ वर्षांनी हे दोन सुपरस्टार्स एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. सलमान खानने या चित्रपटासाठी स्वतः करीनाशी संपर्क साधला असून तिनेही या भूमिकेत रस दाखवला आहे. सलमानसाठीही हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे कारण 'द फॅमिली मॅन' फेम दिग्दर्शक जोडी राज आणि डीके या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

सलमान-करीनाची पाचवी इनिंगसलमान खानच्या या आगामी सिनेमासाठी याआधी साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूच्या नावाची चर्चा होती. मात्र आता करीना कपूरचे नाव आघाडीवर आहे. जर सिनेमात करीनाची एन्ट्री झाली तर सलमान आणि करीना पाचव्यांदा स्क्रीन शेअर करतील. यापूर्वी त्यांनी 'क्यों की...', 'मैं और मिसेस खन्ना', 'बॉडीगार्ड' आणि २०१५ मध्ये 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१५ नंतर ही जोडी परत दिसली नव्हती. ११ वर्षांनी त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'या चित्रपटाचे कथानक अतिशय रंजक असून सलमान खान यात एका वयस्कर सुपरहीरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनपेक्षित परिस्थितीमुळे त्याला पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये परतावे लागते आणि तो एका मोठ्या संघर्षात अडकतो, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा असेल. अतुल अग्निहोत्री आणि मैत्री मुव्ही मेकर्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या नव्या प्रयोगात सलमानला सुपरहीरोच्या अवतारात पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

राज आणि डीके यांचे पुनरागमन'द फॅमिली मॅन', 'फर्जी' आणि 'गन्स अँड गुलाब्स' सारख्या सुपरहिट ओटीटी सीरिज देणारी राज आणि डीके ही जोडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. २०१७ मधील 'ए जेंटलमैन' नंतर या दिग्दर्शक जोडीचा हा मोठा सिनेमॅटिक कमबॅक असेल. ओटीटीवर यश मिळवल्यानंतर राज आणि डीके आता सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर काय जादू करतात, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :सलमान खानकरिना कपूरबॉलिवूड