आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 8KVP Investment Scheme: शेअर बाजारातील गुंतवणूकीतून अधिक परतावा मिळत असला, तरी त्यात मोठी जोखीम मात्र मोठी असते. शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान गुंतवलेल्या रकमेची शाश्वती देता येत नाही. सर्वांनाच आपले पैसे सुरक्षित राहावे असं वाटत असतं. त्यामुळे परतावा कमी असला तरी अनेक जण आजही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य देतात, कारण यात गुंतवलेली रक्कम आणि मिळणारा परतावा हा निश्चित असतो. 2 / 8तुम्हाला तुमची मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी आणि हळूहळू दुप्पट व्हावी असं वाटत असेल, तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra - KVP) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सरकारच्या हमीसह येणारी योजना आहे, म्हणजेच यात गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो.3 / 8किसान विकास पत्र ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक फिक्स्ड इनकम स्कीम आहे. यामध्ये तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी पैसे गुंतवता आणि मुदत पूर्ण झाल्यावर तुमची रक्कम दुप्पट होऊन परत मिळते. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते.4 / 8सध्या यात वार्षिक ७.५% (वार्षिक चक्रवाढ व्याज) व्याजदर देण्यात येतो. या दरानुसार, तुमचा पैसा ११५ महिन्यांत म्हणजेच सुमारे ९ वर्षे ७ महिन्यांत दुप्पट होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही केव्हीपी योजनेत १ लाख रुपये गुंतवले, तर ९ वर्षे ७ महिन्यांनंतर त्याचे २ लाख रुपये होतील.5 / 8या योजनेत किमान गुंतवणूक १,००० रुपये आहे आणि कमाल गुंतवणुकीला कोणतीही सीमा नाही. गुंतवणूक सिंगल किंवा जॉईंट अकाउंटमध्ये केली जाऊ शकते. तसंच, पालक अल्पवयीन मुलाच्या नावानंदेखील खातं उघडू शकतात.6 / 8या योजनेत १००% सरकारी हमी असल्याने पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. याव्यतिरिक्त, कर्जाची सुविधा उपलब्ध आहे, म्हणजेच KVP च्या विरोधात कर्ज घेतलं जाऊ शकतं. याशिवाय खातं कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे आणि नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.7 / 8यात पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. ही एक दीर्घकालीन योजना असली तरी, अडीच वर्षे (२ वर्षे ६ महिने) पूर्ण झाल्यानंतर काही अटींसह पैसे काढले जाऊ शकतात. लक्षात ठेवा की KVP वर मिळणारं व्याज करपात्र (Taxable) असतं, म्हणजेच त्यावर इन्कम टॅक्स नियमांनुसार कर भरावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुमचं कर नियोजन नक्की तपासा.8 / 8एकंदरीत, जोखीम टाळून हमीपूर्वक परतावा हवा असलेल्या लोकांसाठी किसान विकास पत्र हा एक चांगला पर्याय आहे. फक्त एकदा गुंतवणूक करुन सरकारी हमीसह पुढील ११५ महिन्यांत तुम्ही तुमचा पैसा दुप्पट करू शकता.