Stock Market Today: शेअर बाजारामध्ये चढ-उताराचं सत्र सुरूच असून आज देशांतर्गत शेअर बाजारानं घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स १६५.६८ अंकांच्या म्हणजेच ०.२१ टक्क्यांच्या घसरणीसह ७७,१०३.७२ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे एनएसईच्या निफ्टी ५० निर्देशांकानंही आज ६६.७० अंकांच्या म्हणजेच ०.२८ टक्क्यांच्या नुकसानीसह २४,०५२.६० अंकांवर आपला व्यवहार सुरू केला. विशेष म्हणजे सोमवारी बाजारानं ग्रीन झोनमध्ये सुरुवात केली होती आणि एका वेळी चांगली वाढही मिळवली होती, मात्र दिवसाच्या अखेरीस शेअर बाजारानं साधारण वाढीसह व्यापार बंद केला होता.
मंगळवारी बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे निफ्टी ५० मधील ५० पैकी तब्बल ४५ कंपन्यांच्या शेअर्सनी रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला. केवळ ५ कंपन्यांचे शेअर्स आज वेगानं वाढले आहेत. सेन्सेक्सच्या बाबतीतही अशीच स्थिती असून ३० पैकी केवळ ७ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये उघडले, तर उर्वरित २३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अडाणी पोर्ट्सचा शेअर आज सर्वाधिक ०.७० टक्क्यांच्या वाढीसह उघडला, तर बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये १.४१ टक्क्यांची सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
वाढीसह उघडलेल्या इतर प्रमुख शेअर्समध्ये आयटीसी ०.२९ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.२६ टक्के, टीसीएस ०.१७ टक्के, इन्फोसिस ०.१० टक्के, टेक महिंद्रा ०.०८ टक्के आणि सन फार्माच्या शेअर्सचा समावेश आहे ज्यांनी ०.०५ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली.
दुसरीकडे, मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली असून बजाज फिनसर्व्ह १.१४ टक्के, मारुती सुझुकी १.१३ टक्के, एचडीएफसी बँक ०.९१ टक्के, इंडिगो ०.९० टक्के, एल अँड टी ०.८१ टक्के, आणि आयसीआयसीआय बँकेचा शेअर ०.७८ टक्क्यांनी घसरला. याशिवाय एशियन पेंटस, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक आणि टाटा स्टील यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही रेड झोनमध्ये उघडले. इटर्नल, बीईएल, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, भारती एअरटेल, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी आणि पावर ग्रिडच्या शेअर्समध्येही आज घसरण पाहायला मिळत आहे.
Web Summary : Indian stock market started in the red, with both Sensex and Nifty declining. Most Nifty 50 and Sensex companies experienced losses, with Bajaj Finance seeing the biggest drop. Only a few shares like Adani Ports and ITC showed gains.
Web Summary : भारतीय शेयर बाजार लाल निशान में खुला, सेंसेक्स और निफ्टी दोनों में गिरावट आई। निफ्टी 50 और सेंसेक्स की ज्यादातर कंपनियों को नुकसान हुआ, बजाज फाइनेंस में सबसे बड़ी गिरावट देखी गई। केवल कुछ शेयर जैसे अडानी पोर्ट्स और आईटीसी में लाभ दिखा।