शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:32 IST

१८ दिवसांपासून असलेल्या शस्त्रसंधीनंतर अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता थेट इराणच्या जहाजांवर हल्ले केले आहेत. 

पश्चिम आशियातील युद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण अमेरिकेने शस्त्रसंधी उधळून लावत होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणच्या मालवाहू जहाजांनाच लक्ष्य केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात जहाजांवरील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणच्या लष्कराने केला आहे. अमेरिकेने ज्या जहाजांना लक्ष्य केले, त्या युद्धनौका नव्हत्या तर मालवाहू जहाजे होती, असे आयआरजीसीने म्हटले आहे. 

इराण-अमेरिका यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीमुळे थांबलेला संघर्ष पुन्हा पेटू लागला आहे. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे आपली अडकलेली जहाजे बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकेच्या लष्कराने दावा केला आहे की, दोन जहाजांना यशस्वीपणे बाहेर काढले आहे. 

अमेरिकेच्या जहाजांवर इराणचा हल्ला

दरम्यान, इराणने असा दावा केला होता की, आयआरजीसीने अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केला आहे. पण, अमेरिकेच्या सैन्याने हा दावा फेटाळून लावला आहे. अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला अमेरिकन युद्धनौकेवर झालेला नाही. इराणचा दावा निराधार आहे. 

संयुक्त अरब अमिरातीवर इराणचे मिसाईल हल्ले 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये इराणने हल्ले केले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टिमने रोखल्या. १२ बॅलेस्टिक मिसाईल्स, ३ क्रूझ मिसाईल्स आणि ४ ड्रोन्स इराणकडून डागण्यात आले होते, असे यूएईने म्हटले आहे. 

४ मे रोजी डागण्यात आलेल्या मिसाईल्स आणि ड्रोन्स रोखताना चार लोक जखमी झाले. युद्ध सुरू झाल्यापासून इराणकडून यूएईवर करण्यात आलेल्या हल्ल्यांपैकी ५४९ बॅलेस्टिक मिसाईल्स, २९ क्रूझ मिसाईल्स आणि २२६० ड्रोन्स हवेतच पाडण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात २२७ लोक जखमी झाले असून, यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War: US attacks ships, deaths reported in Hormuz Strait.

Web Summary : Tensions rise as US targets Iranian ships in Hormuz Strait, allegedly killing five. Iran claims US struck cargo ships, not warships. UAE reports intercepting missiles and drones fired by Iran, injuring several.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध