1 / 10Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 2 / 10'राजा शिवाजी' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर थिएटरही हाऊसफूल झाल्याचं दिसलं. आता या सिनेमाचं ४ दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. 3 / 10'राजा शिवाजी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटींचा गल्ला जमवला. मराठीत ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला. 4 / 10तर दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींची कमाई रितेशच्या 'राजा शिवाजी'ने केली. तिसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत वीकेंडला २२.५५ कोटींचा गल्ला कमावला. 5 / 10मंडे टेस्टमध्येही 'राजा शिवाजी' सिनेमा पास झाला आहे. सोमवारी सिनेमाच्या कमाईत घट झाली असली तरी 'राजा शिवाजी'ने ५.६० कोटींचा बिजनेस केला आहे. 6 / 10प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांतच रितेश देशमुखच्या सिनेमाने ३९ कोटी कमावले असून सिनेमाची ५० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 7 / 10'राजा शिवाजी' सिनेमा मराठीतला ब्लॉकबस्टर ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 8 / 10१०० कोटींचं बजेट असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा पहिल्यांदाच मराठीत इतक्या मोठ्या स्केलवर बनला आहे. 9 / 10या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन, संजय दत्त हे बॉलिवूड कलाकार झळकले आहेत. 10 / 10'राजा शिवाजी' सिनेमात मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत.