Gold Silver Price Today: सोने चांदीच्या किमतीत ०५ मे २०२६ (मंगळवार) रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज जिथे सोन्याच्या भावात किरकोळ तेजी दिसत आहे, तिथेच चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण नोंदवली गेली. कालच चांदीच्या किमतीत ७,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली होती. कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उताराचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसत आहे.
काय आहे नवी किंमत?
आज देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचा भाव १,४९,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४३,४३८ रुपये प्रति किलोग्रामवर उघडले. सोमवारी MCX वर सोन्याची किंमत १,४९,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४४,००१ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाले होते.
काल बंद झालेल्या भावापेक्षा आज १० ग्रॅम सोने २०० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि १ किलो चांदीच्या किमतीत ५६३ रुपये प्रति किलोग्रामची घसरण नोंदवण्यात आली. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या तेजीनंतर किरकोळ घसरण दिसून येतेय. परंतु अद्यापही WTI क्रूडची किंमत १०४ डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडची किंमत ११३ डॉलर प्रति बॅरलवर आहे, ज्यामुळे कमोडिटी बाजारावर दबाव दिसत आहे.
आजचा चांदीचा भाव
आज चांदीची किंमत मोठ्या दबावाचा सामना करत आहे, परंतु ही घसरण सर्वसामान्यांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये एक किलो चांदीचा भाव २,५५,००० रुपये प्रति किलोग्राम झालाय. याशिवाय चेन्नईमध्ये किंमत २,६५,००० रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. मार्केटमधील अनेक जाणकारांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, मध्य पूर्वेतील तणावामुळे शॉर्ट टर्ममध्ये किमतींवर दबाव राहू शकतो. परंतु लाँग टर्ममध्ये कमोडिटी बाजारात तेजी परत येऊ शकते.
पाहा काय आहे सोन्याचा दर? (सोर्स - गुड रिटर्न्स)
| शहर | 24 कॅरेट सोन्याचा भाव | 22 कॅरेट सोन्याचा भाव | 18 कॅरेट सोन्याचा भाव |
| दिल्ली | ₹1,49,230 | ₹1,36,900 | ₹1,12,040 |
| मुंबई | ₹1,49,180 | ₹1,36,750 | ₹1,11,890 |
| भोपाळ | ₹1,49,230 | ₹1,36,800 | ₹1,11,940 |
| हैदराबाद | ₹1,49,180 | ₹1,36,750 | ₹1,11,890 |
| बंगळुरू | ₹1,49,180 | ₹1,36,750 | ₹1,11,890 |
| चेन्नई | ₹1,50,770 | ₹1,38,200 | ₹1,15,300 |
| कोलकाता | ₹1,49,180 | ₹1,36,750 | ₹1,11,890 |
Web Summary : Gold prices saw a slight increase, while silver prices decreased marginally on the MCX. Crude oil price fluctuations influence gold and silver rates. Today, gold opened at ₹1,49,550 per 10 grams, and silver at ₹2,43,438 per kg. Silver prices in major cities are around ₹2,55,000/kg.
Web Summary : एमसीएक्स पर सोने की कीमतों में थोड़ी वृद्धि देखी गई, जबकि चांदी की कीमतों में मामूली गिरावट आई। कच्चे तेल की कीमतों में उतार-चढ़ाव सोने और चांदी की दरों को प्रभावित करता है। आज सोना ₹1,49,550 प्रति 10 ग्राम और चांदी ₹2,43,438 प्रति किलोग्राम पर खुली। प्रमुख शहरों में चांदी की कीमतें लगभग ₹2,55,000/kg हैं।