Power Bank Catches Fire On IndiGo Flight: हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानात मंगळवारी दुपारी लँडिंगनंतर अचानक धूर पसरल्याने एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असून, सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन स्लाइडद्वारे सर्व १९८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
नेमकी घटना काय?
मंगळवारी दुपारी साधारण ३.२९ वाजता हे विमान चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान टॅक्सी वेवरून पार्किंग बे कडे जात असतानाच एका प्रवाशाच्या सीट पॉकेटमधील पाऊचमध्ये असलेल्या पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला. या घटनेनंतर विमानाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला.
विमान कर्मचाऱ्यांची तत्परता
विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन अग्निशमन बाटल्यांचा वापर करून आग विझवली. धूर पसरल्यामुळे तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आणि विमानाचे सर्व सहा आपत्कालीन दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
एका प्रवाशाला इजा
आपत्कालीन स्लाइडवरून खाली उतरताना एका महिला प्रवाशाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. तिला तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून उर्वरित सर्व १९८ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे.
DGCA आणि इंडिगोचे स्पष्टीकरण
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर बँक सीट पॉकेटमध्ये असतानाच पेटली होती. इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, "५ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलवर नेण्यात आले आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हे विमान पुन्हा सेवेत येण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल".
Web Summary : A power bank exploded on an IndiGo flight landing in Chandigarh, causing panic. All 198 passengers were safely evacuated via emergency slides. One woman sustained a minor injury during the evacuation. The incident is under investigation by DGCA and IndiGo; the aircraft will undergo thorough checks.
Web Summary : चंडीगढ़ में इंडिगो विमान उतरते ही पावर बैंक में विस्फोट हुआ, जिससे दहशत फैल गई। सभी 198 यात्रियों को आपातकालीन स्लाइड के माध्यम से सुरक्षित निकाला गया। एक महिला को मामूली चोट आई। डीजीसीए और इंडिगो द्वारा घटना की जांच की जा रही है; विमान की पूरी जांच होगी।