IPL 2026 DC vs CSK : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत आगेकूच करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DC ला मोठा दिलासा, CSK दोन बदलासह उतरला मैदानात
दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दुखापतीतून सावरून लुंगी एनिग्डी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कायले जेमिसनच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषसह दोन बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अकिल होसीन आणि गुरजपनीत सिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कमबॅकची संधी दिली आहे.
यंदाच्या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला २३ धावांनी पराभूत केले होते. आता घरच्या मैदानात या पराभवाची परतफेड करून दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Web Summary : DC faces CSK at Arun Jaitley Stadium. DC chose to bat first after winning the toss. Ngidi returns for DC, while CSK fields Hosein and Gurjapneet. CSK previously defeated DC. Delhi seeks revenge at home.
Web Summary : अरुण जेटली स्टेडियम में डीसी का मुकाबला सीएसके से है। डीसी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। एनगिडी डीसी के लिए लौटे, जबकि सीएसके ने होसैन और गुरजपनीत को मैदान में उतारा। सीएसके ने पहले डीसी को हराया था। दिल्ली घर पर बदला लेना चाहती है।