शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 12:07 IST

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले

पुणे : पुणे शहरात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मागील महिन्यात एका दिवसाच्या पावसाच्या पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गामुळे पुण्यातील नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. 

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यात प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. कालही महापालिका, जलसंपदा विभाग, अग्निशमन दल यांना सूचना दिल्या होत्या. पाणी सोडण्याअगोदर लोकांना सूचित करा, सायरन वाजवा असे सांगण्यात आले आहे. लष्कराशी आमचे बोलणे झाले आहे. जिकडे पूरपरिस्थिती आहे तिकडे एनडीआरएफ आणि लष्कर तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून २६.९९ टीएमसी पाणी वाढले असून ९२.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर आज सकाळी ११ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ क्युसेकने होणारा विसर्ग वाढवून 35 हजार 2 क्यूसेक करण्यात आला आहे. मुळशी धरणातून मुळा नदीत सुरु असणारा २४ हजार ७४५ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता २७ हजार २८२ करण्यात येणार आहे. धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपाञ, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी येथे व इतरञ ठिकाणी दलाचे अधिकारी व जवान टॉर्च, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, मेगा फोन्स व बोट अशा बचाव साहित्यासह तैनात असून मेगा फोनवरुन सूचना देण्यात येत आहेत.

नागरिकांनी वाहने हळू चालवावीत  शहरातील रस्त्यांवर सुट्टीचा दिवस असल्याने वाहनांचे प्रमाण कमी दिसून आले आहे. परंतु लोकांना आज कुठेही बाहेर फिरायला जाणे शक्य झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी, केळकर, फर्ग्युसन, बाजीराव, जंगली महाराज रस्ता याबरोबरच स्वारगेट, हडपसर, धनकवडी, धायरी उपनगरात मुसळधार पाऊस होतोय. पावसाळयात बऱ्याच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे. महापालिकेकडून रस्त्यांची तात्पुरती डाकडूची केली जात आहे. पण दोन - तीन दिवसात त्याच जागेवर खड्डा तयार झाल्याचे दिसत आहे. रस्त्यांवर खडे, वाळू पसरलेली दिसून आली आहे. त्यामुळे वाहने चालवताना घसरण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी हळूहळू वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. 

अजित पवारांनी दिले निर्देश 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी.  त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पुररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गDamधरणWaterपाणीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार