शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 08:20 IST

नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण आणि मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण आणि मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. या सर्वप्रकरणी तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. तसेच धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

नाशिक धर्मांतर प्रकरणातील सर्व पॅटर्नचा अभ्यास करा

नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना, धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हे प्रकरण स्वतःहून उजेडात आणल्याबद्दल नाशिक पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. मात्र, आता तपास तितकाच दमदार व्हावा, यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही मुद्दा तपासातून सुटू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितांना तक्रार देण्यासाठी विश्वास देणे आवश्यक असल्याचे सांगत, त्यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याच्या सूचना केल्या. संबंधित समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्यावर त्यांनी भर दिला.

खरात प्रकरणात पीडितांचा विश्वास जिंकणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात दोषी कोणीही असो, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. न्यायालयात खटला मजबूत होण्यासाठी तपासाची दिशा ठोस ठेवावी आणि अपराधसिद्धी हा केंद्रबिंदू असावा, असे त्यांनी सांगितले.

मुंबई ड्रग्ज प्रकरणात कारवाईची व्याप्ती वाढवा

गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्याचे आदेश त्यांनी दिले. तरुणाईच्या भविष्याशी निगडित हा गंभीर मुद्दा असल्याने अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

कंपनीतील कथित प्रकाराबाबत फरार असलेल्या निदा खानने शनिवारी नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, अशी माहिती तिचे वकील बाबा सय्यद यांनी दिली. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. निदा गर्भवती असून, तिच्यावर उपचार करायचे आहे, तिचा या प्रकरणाशी संबंध नाही वगैरे कारणे निदा खानने वकिलांमार्फत दिले आहेत. निदा खानच्या पतीची मुंब्रा येथे जाऊन एसआयटीने चौकशी केली होती. निदा खान गुन्हा घडल्यापासून फरार असून, ती कंपनीत एचआर हेड नसून प्रोसेस असोसिएट असल्याचा दावा टीसीएस कंपनीने अधिकृत पत्राद्वारे केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : No religious conversions tolerated: CM Fadnavis issues strict police orders.

Web Summary : CM Fadnavis reviewed Nashik conversion, sexual abuse cases, directing thorough, impartial investigations. He emphasized zero tolerance for forced religious conversions, urging proactive policing. He also focused on drug cases, ordering statewide action.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण