शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 23:36 IST

Congress on PM Modi speech : "५९ वेळा काँग्रेसचा जप, महिलांचे नावही नाही!" खर्गेंनी PM मोदींना आरसा दाखवला; काँग्रेसच्या ३ अटी जाहीर.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी अधिकृत व्यासपीठाचा वापर केवळ राजकीय चिखलफेक आणि खोटे बोलण्यासाठी केला आहे," असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या भाषणात नारी शक्तीपेक्षा काँग्रेसचाच द्वेष जास्त दिसून आला, अशी टीकाही त्यांनी केली.

खर्गे यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले की, "पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात ५९ वेळा काँग्रेसचा उल्लेख केला, तर महिलांचा उल्लेख अत्यंत कमी वेळा केला. यावरूनच त्यांचे प्राधान्य काय आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची आहे, कारण काँग्रेस नेहमी इतिहासाच्या योग्य बाजूने उभी राहिली आहे." गेल्या १२ वर्षांत काहीही ठोस करता न आल्याने हताश होऊन पंतप्रधान आता लोकशाही आणि संविधानाचा अपमान करत आहेत, असा आरोप खर्गेंनी केला. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा २०१० मध्ये राज्यसभेत काँग्रेसनेच मंजूर केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. भाजपशासित राज्यांत महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. हाथरस, उन्नाव आणि हरियाणात महिला कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक यावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल खर्गेंनी विचारला.

बिल्किस बानो प्रकरण...भाजपने बलात्काऱ्यांना वाचवले आणि बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केली, ही त्यांची नारी शक्तीबद्दलची कटिबद्धता आहे का? असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या ३ प्रमुख मागण्यासध्याच्या ५४३ लोकसभा जागांमध्येच ३३% महिला आरक्षण त्वरित लागू करणारे विधेयक आणा. महिला आरक्षण आणि परिसीमन यांची सांगड घालणे बंद करा. हा केवळ राजकीय स्वार्थासाठी नकाशा बदलण्याचा कट आहे. १४० कोटी भारतीयांची दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे.

जयराम रमेश यांची 'डिस्ट्रेस एड्रेस' म्हणून टीकाकाँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला 'राष्ट्र के नाम संदेश' ऐवजी 'डिस्ट्रेस एड्रेस' (तणावात दिलेले भाषण) असे संबोधले. ते म्हणाले की, "जनधन, आधार आणि जीएसटी या योजना काँग्रेसच्याच आहेत. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मनमोहन सिंग यांनी आधार आणले आणि राजीव गांधींनी डिजिटल इंडियाचा पाया रचला. मोदींनी केवळ या योजनांचे मार्केटिंग केले आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Slams Modi's Speech: A 'Distress Address' Accusation Leveled.

Web Summary : Congress criticizes Modi's speech on women's reservation, calling it a political ploy. Kharge accuses Modi of prioritizing Congress over women's issues, questioning his commitment given BJP's record. Congress demands immediate implementation of women's reservation without linking it to delimitation.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीWomen Reservationमहिला आरक्षणcongressकाँग्रेस