Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी

अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना सामना पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला होता. पण...

By सुशांत जाधव | Updated: April 18, 2026 19:59 IST

Open in App

IPL 2026, Delhi Capitals won by 6 wkts vs Royal Challengers Bengaluru  लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सच्या दमदार अर्धशतकानंतर डेविड मिलरच्या किलर फिनिशिंग टचच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पाहुण्या दिल्ली कॅपिटल्ससमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भुवीनं धक्क्यावर धक्के दिले, अखेरच्या षटकात मॅच RCB च्या बाजूनं फिरली, पण...

या धावांचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारनं पॉवर प्लेमध्ये आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकलले होते. पण संघ अडचणीत असताना लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी अर्धशतकी खेळीसह  संघाला पुन्हा सामन्यात आणले. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना सामना पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला होता. पण डेविड मिलरनं दोन षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला.

IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं

पॉवर प्लेमध्ये भुवीचा भेदक मारा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. भुवीनं पथुम निसंका याला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेला करून नायर ५ चेंडूत पाच धावा करून माघारी फिरला. समीर रिझवीही अवघ्या दोन धावांवर बाद झाला. भुवीच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सची अवस्था ३ बाद १८ अशी बिकट झाली होती. 

लोकेश राहुलचं दमदार अर्धशतक

संघ अडचणीत असताना लोकेश राहुलनं ट्रिस्टन स्टब्सच्या साथीनं डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. लोकेश राहुल लयीत दिसत असताना क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर विराट कोहलीनं ५७ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला.    ट्रिस्टन स्टब्स अक्षर पटेलची महत्त्वपूर्ण भागीदारी अन् किलर मिलरचा मॅच विनिंग स्टोक

लोकेश राहुल सामना सेट करून परतल्यावर ट्रिस्टन स्टब्सनं कर्णधार अक्षर पटेलच्या साथीनं ३४ चेंडूत ४७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्नायू दुखापतीमुळे अक्षर पटेल रिटायर्ड हर्ट होऊन परतल्यावर डेविड मिलर मैदानात उतरला. त्याने स्टब्सच्या साथीनं २४ चेंडूत ४५ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्टब्सनं ४७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ६० धावांची नाबाद खेळी केली. मिलरनं फक्त १० चेंडूत २२० च्या स्ट्राईक रेटसह २२ धावा कुटल्या. RCB कड़ून भुवीनं सर्वाधिक ३ तर क्रुणाल पांड्यानं एक विकेट घेतली. 

फिल सॉल्टची सॉलिड फिफ्टी, पण  ना विराट चालला ना रजत पाटीदार 

पहिल्यादा फलंदाजी करताना फिल सॉल्ट आणि विराट कोहलीनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण विराट कोहली १३ चेंडूत १९ धावा करू माघारी फिरला. देवदत्त पडिक्कलही चांगली सुरुवात मिळाल्यावर १८ धावांवरच बाद झाला. कर्णधार रजत पाटीदारही या सामन्यात फक्त ४ धावांची भर घालू शकला. फिल सॉल्टनं ३८ चेंडूत केलेल्या ६३ धावा आणि टिम डेविडच्या १७ चेंडूतील २६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १७५ धावा केल्या होत्या. दिल्लीच्या संघाकडून लुंगी एनिग्डी, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी २-२ तर मुकेश कुमारनं एक विकेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Miller's Finish! DC Defeats RCB in Thrilling Last Over Win

Web Summary : Rahul and Stubbs' fifties, plus Miller's finishing, secured a 6-wicket win for Delhi Capitals against Royal Challengers Bangalore. Salt's fifty set a 178 target, but Delhi chased it down despite a shaky start. Miller's late sixes sealed the victory.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलअक्षर पटेलविराट कोहली