Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?

तो धावबाद होता होता वाचला. दुखापतीनं त्रस्त असताना मैदान न सोडता खेळण्याचा निर्णय घेतला, पण...

By सुशांत जाधव | Updated: April 18, 2026 23:31 IST

Open in App

IPL 2026 Ayush Mhatre Injury : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला एक मोठा धक्का बसला. तुफान फटकेबाजीसह चेन्नई सुपर किंग्सची धावगती एक्सप्रेसच्या गतीने पुढे घेऊन जाणारा १८ वर्षीय आयुष म्हात्रे पॉवर प्लेमध्ये  लंगडत लंगडत खेळताना दिसला. तो स्नायू दुखापतीनं त्रस्त असताना फिजिओ मैदानात आले. रिटायर्ड हर्ट होऊन परतण्याऐवजी त्याने पॉवर प्लेमध्ये खेळ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चेन्नई सुपर किंग्सच्या चांगलाच अंगलट आला. लंगडत लंगडत धाव पूर्ण केल्यावर पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. क्लासेन याने त्याचा अप्रतिम झेल टिपला. 

आयुष म्हात्रे लंगडताना दिसला; नेमकं काय झाल? 

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन याने पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचणाऱ्या प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारून खाते उघडले. पण तो ७ धावा करून माघारी फिरला. अवघ्या १५ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर मैदानात उतरलेल्या आयुष म्हात्रेनं तुफान फटकेबाजी करत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी २१ चेंडूत ५१ धावांची भागीदारी रचली. नितीश कुमार रेड्डी घेऊन आलेल्या पाचव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव पूर्ण केली. तो धावबाद होता होता वाचला. त्यानंतर दुखापतीनं त्रस्त असतानाही त्याने मैदान न सोडता खेळण्याचा निर्णय घेतला.

खरंच हा धोका पत्करण्याची गरज होती का?

पण धोका पत्करुन त्याने जो डाव खेळला तो पुढच्याच चेंडूवर फसला. आयुष म्हात्रे १३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा करुन बाद झाला. त्यात जोडी फुटल्यावर पुढच्या षटकात ऋतुराज गायकवाडनंही तंबूचा रस्ता धरला. एका चुकीच्या निर्णयामुळे दोन विकट्स गमावण्याची वेळ चेन्नई सुपर किंग्सवर आली. खरंच त्याला खेळवण्याची गरज होती का? रिटायर्ड हर्टच्या रुपात त्याला विश्रांती देत चेन्नई सुपर किंग्सने सेफ गेम खेळण्याचा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न निर्माण होता. कारण सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जे घडलं त्याची मोठी किंमत CSK ला उर्वरित सामन्यातही मोजावी लागू शकते. आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. SRH विरुद्ध या स्टार खेळाडूबाबत CSK नं निष्काळजीपणाच दाखवल्याचे दिसून आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ayush Mhatre's injury gamble backfired; Was the risk necessary?

Web Summary : Ayush Mhatre's injury hampered CSK in a crucial match. Despite a leg injury, he continued playing but was soon dismissed. This risky decision and subsequent wicket loss put CSK under pressure, raising questions about the team's strategy.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादआयुष म्हात्रेऋतुराज गायकवाड