Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं

एकाही बॅटरला जबाबदारी घेऊन मोठी खेळी करण्याची हिंमत दाखवता आली नाही. त्याची किंमत चेन्नई सुपर किंग्सला पराभवाने चुकवावी लागली.

By सुशांत जाधव | Updated: April 19, 2026 00:12 IST

Open in App

IPL 2026, Sunrisers Hyderabad Defeated Chennai Super Kings : अभिषेक शर्मा आणि हेन्री क्लासेन यांच्या दमदार अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत एशान मलिंगाचा भेदक मारा आणि अखेरच्या षटकात प्रफुल हिंगेनं अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात १० धावांनी विजय नोंदवला. धावांचा पाठलाग करताना ठराविक अंतराने विकेट गमावल्यावरही चेन्नई सुपर किंग्सचा संघ सामन्यात होता. पण एकाही बॅटरला जबाबदारी घेऊन मोठी खेळी करण्याची हिंमत दाखवता आली नाही. त्याची किंमत चेन्नई सुपर किंग्सला पराभवाने चुकवावी लागली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अभिषेकच्या वादळी अर्धशतकानंतर क्लासेनची क्लास खेळी

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मानं २२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केलेल्या ५९ धावा आणि हेन्री क्लासेन याने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने  केलेल्या ५९ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १९४ धावा करत चेन्नई सुपर किंग्स समोर १९५ धावांचे टार्गेट सेट केले होते. गोलंदाजीत चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश चौधरी याने २ तर गुरजपनीत सिंग याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?

अर्धशतकाशिवाय संपला CSK चा डाव, त्यामुळेच गणित फसलं

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन याने प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर षटकारासह खाते उघडले. पण तो फक्त ७ धावा करून माघारी फिरला.  त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे जोडी जमाली. १८ वर्षीय आयुष म्हात्रेनं १३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावांची दमदार खेळी केली. दुखापतीनं त्रस्त असताना मैदान न सोडता त्याने खेळण्याचा निर्णय घेतला. पण तो पुढच्याच चेंडूवर बाद झाला. मग ऋतुराज गायकवाडनं १३ चेंडूत १९ धावा करत विकेट फेकली. मॅथ्यू शॉर्टनं ३० चेंडूत ३४ धावांची खेळी केली. सरफराज खान १९ चेंडूत २५ धावा केल्या. या दोघांनाही  एशान मलिंगानं तंबूचा रस्ता दाखवला. शिवांग कुमारनं डेवॉल्ड ब्रेविसला खातेही उघडू दिले नाही.

साकिब हुसेन याने शिवम दुबेची विकेट घेतली, शेवटच्या षटकात प्रुफल चमकला

 अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि जेमी ओव्हरटन यांच्यावर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. पण साकिब हुसेन याने शिवम दुबेची विकेट घेत चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूटवर ढकलले. चेन्नईच्या संघाला अखेरच्या षटकात १८ धावांची गरज होती. ईशान किशन याने शेवटच्या षटकाची जबाबदारी पहिल्या ३ षटकात ५४ धावा खर्च करून महागडा ठरलेल्या प्रफुल हिंगेकडे सोपवली. त्यानेही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. या षटकात त्याने जेमी ओव्हरटनच्या रुपात एक विकेटही आपल्या खात्यात जमा केली. एशान मलिंगा हा सनरायझर्सच्या ताफ्यातून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २९ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Malinga's Bowling, Praful's Finish Secure SRH Victory Over CSK in IPL 2026

Web Summary : Hyderabad defeated Chennai by 10 runs, powered by Abhishek Sharma and Klassen's fifties. Malinga's crucial wickets and Hingane's accurate final over sealed the win despite CSK's chase.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सअभिषेक शर्माइशान किशनऋतुराज गायकवाडआयुष म्हात्रेशिवम दुबेसर्फराज खान