शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:25 IST

Indian Oil Tanker Jag Arnav firing: इराणकडून भारतीय जहाजावर गोळीबार! २० लाख बॅरल कच्च्या तेलाचा टँकर लक्ष्य; परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूताला झापले.

मध्य-पूर्वेतील युद्धाचे चटके काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. इराकहून २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन येत असलेल्या 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' या दोन तेलवाहू जहाजांवर इराणच्या मच्छर आर्मीने गोळीबार केला आहे. भारताने तातडीने या कृत्याचा निषेध नोंदविला असून इराणच्या राजदूताला पाचारण केले आहे. 

इराकचे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या 'जग अर्णव' या भारतीय ध्वज असलेल्या तेल टँकरवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी शनिवारी दुपारी गोळीबार केला. या घटनेनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत इराणच्या राजदूताला पाचारण करून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

विना इशारा गोळीबारब्रिटनच्या 'मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन सेंटर'नुसार, इराणच्या दोन 'गनबोट्स' भारतीय जहाजाजवळ आल्या आणि त्यांनी रेडिओवरून कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गोळीबार सुरू केला. या ताफ्यात 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' ही दोन भारतीय जहाजे होती. गोळीबार झाल्यानंतर दोन्ही जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पार न करताच माघार घेतली. सुदैवाने, जहाजावरील सर्व कर्मचारी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

इराणचा आडमुठेपणाइराणने २४ तासांपूर्वीच हा मार्ग खुला केल्याचे म्हटले होते, मात्र अमेरिकेने नाकेबंदी सुरू ठेवल्याचा आरोप करत इराणने पुन्हा एकदा या मार्गावर लष्करी बळाचा वापर सुरू केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून इराणच्या राजदूताला पाचारण करून आपला अधिकृत निषेध नोंदवला आहे. सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतेही भारतीय युद्धनौका तैनात नाही, मात्र ओमानच्या खाडीत भारतीय नौदलाची युद्धनौका तैनात असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Ship 'Jag Arnav' Targeted; India Summons Iranian Envoy

Web Summary : Iran's military fired on Indian oil tankers, 'Jag Arnav' and 'Sanmar Herald', carrying Iraqi crude oil. India strongly protested, summoning the Iranian ambassador. No casualties were reported. The incident occurred near the Strait of Hormuz. Indian Navy monitoring the situation.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध