IPL 2026 RCB vs DC Krunal Pandya Gets Run Out After Huge Mix Up With Jitesh Sharma : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ऑलराउंडर क्रुणाल पांड्या विचित्र पद्धतीने धावबाद झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात लुंगी एनिग्डी याने वाईडच्या रुपात एक अवांतर धाव दिली असताना नॉन स्ट्राईक एन्डवर असलेल्या जितेश शर्मानं चोरटी धाव घेण्यासाठी मैदान सोडले. तो स्ट्राईक एन्डला पोहचला असताना क्रुणाल पांड्या आपल्या जागीच होता. दोन्ही फलंदाज एकाच क्रीजवर आल्यावर दिल्लीकरांनी विकेटचा डाव साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही फलंदाज एकाच क्रिजमध्ये, दिल्लीकरांनी साधला विकेटचा डाव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावातील अखेरच्या षटकात लुंगी एनिग्डी गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा खर्च केल्यावर एनिग्डीनं तिसरा चेंडू बाउन्सर मारला. यावर क्रुणाल पांड्याने हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू काही त्याच्या टप्प्यात आला नाही. चेंडू सरळ विकेटमागे उभे असलेल्या लोकेश राहुलच्या हातात विसावला. अंपायरने हा चेंडू वाईड असल्याचे घोषित केले. त्यात आणखी एका धावेची भर घालण्याच्या इराद्याने जितेश शर्मा स्ट्राईक एन्डला पोहचला. तो क्रीजमध्ये पोहचल्याचे पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला अन् धाव पूर्ण करण्यासाठी त्याने मैदान सोडले. केएल राहुलनं गोलंदाज लुंगी एनिग्डीकडे चेंडू टाकला अन् त्याने क्रुणालला धावबाद केले. धाव होत असताना गडबड करणाऱ्या जितेश शर्माकडे रागाने पाहत क्रुणाल पांड्याने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले.
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
क्रुणाल पांड्यानं एका षटकाराच्या मदतीने केल्या १२ धावा
पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्टनं ३८ चेंडूत केलेल्या ६३ धावांसह टिम डेविडने १७ चेंडूत केलेल्या २६ धावांच्या खेळीनंतर क्रुणाल पांड्याने एका षटकाराच्या मदतीने १० चेंडूत १२ धावा केल्या. RCB नं निर्धारित २० षटकात १७५ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : In RCB vs DC, Krunal Pandya was run out after a mix-up with Jitesh Sharma. Sharma's attempt to steal a run led to both batsmen being on the same crease. Pandya showed his frustration after the dismissal.
Web Summary : RCB बनाम DC में, जितेश शर्मा के साथ भ्रम के बाद क्रुणाल पांड्या रन आउट हो गए। शर्मा द्वारा रन चुराने के प्रयास के कारण दोनों बल्लेबाज एक ही क्रीज पर आ गए। आउट होने के बाद पांड्या ने अपनी निराशा दिखाई।