नोएडामध्ये कामगारांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफला (STF) मोठं यश मिळालं आहे. शनिवारी एसटीएफच्या नोएडा युनिटने हिंसाचाराचा मास्टरमाइंड आदित्य आनंद याला तामिळनाडूतून अटक केली आहे. आदित्यवर नोएडा पोलीस आयुक्तांनी १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नोएडा पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने आदित्यला तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं.
आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गौतम बुद्ध नगर न्यायालयाने आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) देखील जारी केलं होतं. पोलीस आणि एसटीएफच्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर आयुक्तालयांतर्गत झालेल्या कामगार आंदोलनादरम्यान प्रक्षोभक आणि हिंसक घटनांमध्ये आदित्य आनंदचा सहभाग आढळला होता. या संपूर्ण कटात तो मास्टरमाइंड म्हणून समोर आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य आनंदने NIT जमशेदपूरमधून बी.टेक. पूर्ण केलं आहे. तो एक उच्चशिक्षित इंजिनिअर आहे, परंतु तपासात त्याचे संबंध एका संघटनेशी असल्याचं समोर येत आहे. तपासात असाही खुलासा झाला आहे की, नोएडातील आंदोलनादरम्यान आदित्य सतत त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने अत्यंत चलाखीने QR कोडच्या माध्यमातून अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार केले होते, ज्यामध्ये हजारो आंदोलकांना जोडले गेले होते. या ग्रुप्सच्या माध्यमातून तो प्रक्षोभक मेसेज पसरवत असे आणि लोकांना हिंसाचारासाठी चिथावणी देत असे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने सातत्याने भडकाऊ भाषणृं देऊन शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा मोठा कट रचला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता आणि आपली ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये सातत्याने ठिकाणं बदलत होता. नोएडातील 'फेज-२' पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या हिंसक कटात सामील असलेल्या इतर लोकांच्या शोधासाठी दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील विविध ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे.
Web Summary : Aditya Anand, the mastermind behind the Noida violence, was arrested in Tamil Nadu. He had a bounty of ₹1 lakh on his head. Anand, a B.Tech graduate, allegedly used WhatsApp groups to incite violence during labor protests. Police are searching for other involved individuals.
Web Summary : नोएडा हिंसा का मास्टरमाइंड आदित्य आनंद तमिलनाडु में गिरफ्तार। उस पर 1 लाख रुपये का इनाम था। बी.टेक स्नातक आनंद पर श्रम विरोध के दौरान हिंसा भड़काने के लिए व्हाट्सएप समूहों का उपयोग करने का आरोप है। पुलिस अन्य शामिल व्यक्तियों की तलाश कर रही है।