शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:41 IST

America vs Cuba: अमेरिकन नौदलाच्या MQ-4C Triton या सर्वात महागड्या ड्रोनने क्युबाच्या किनारपट्टीवर ६ तास पाळत ठेवली. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका क्युबामध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे का?

व्हेनेझुएलातील राजकीय उलथापालथीनंतर आता अमेरिकेची नजर 'क्युबा'वर वळल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन नौदलाचे सर्वात प्रगत आणि महागडे ड्रोन MQ-4C Triton क्युबाच्या समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर सुमारे ६ तास घिरट्या घालत होते. या घटनेमुळे कॅरिबियन समुद्रात तणाव वाढला असून, क्युबामध्येही 'ऑपरेशन मादुरो' सारखी मोहीम राबवली जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप ठेवून मोठे बक्षीस जाहीर केले होते. क्युबा हा व्हेनेझुएलाचा सर्वात जवळचा मित्र देश मानला जातो. क्युबामध्ये रशिया आणि चीनचा वाढता हस्तक्षेप अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो, असे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळेच क्युबाच्या किनारपट्टीवर सुरू असलेली ही पाळत एका मोठ्या लष्करी किंवा राजकीय मोहिमेची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली 'डोळे'ज्या ड्रोनने क्युबाच्या किनाऱ्यावर घिरट्या घातल्या, ते साधेसुधे ड्रोन नाही. MQ-4C Triton हे अमेरिकन नौदलाचे सर्वात महागडे पाळत ठेवणारे ड्रोन आहे. विशेषता: हे ड्रोन ३६० अंश कोनात समुद्रावर लक्ष ठेवू शकते. एका वेळी २४ तासांहून अधिक काळ हवेत राहण्याची आणि ५०,००० फूट उंचीवरून हाय-रिझोल्यूशन फोटो घेण्याची याची क्षमता आहे. शत्रूची जहाजे, पाणबुड्या आणि किनारपट्टीवरील लष्करी हालचालींचा अचूक वेध घेण्यासाठी याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे सुमारे २२०० कोटींचे ड्रोन होर्मुझच्या खाडीत कोसळले होते. 

रशिया-चीनच्या हालचालींवर नजर?क्युबाने अलीकडच्या काळात रशियाच्या युद्धनौकांना आपल्या बंदरात जागा दिली होती. तसेच चीन क्युबामध्ये गुप्तचर केंद्र उभारत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपले सर्वात प्रगत ड्रोन पाठवून क्युबा आणि तिथल्या परकीय लष्करी हालचालींना घेरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Cuba in Focus? US Drone Activity Raises Concerns Amidst Regional Tensions

Web Summary : Following Venezuelan turmoil, US focuses on Cuba. A US Navy drone circled Cuba for 6 hours, raising tensions. Cuba's ties with Russia and China, and alleged intelligence activities, worry the US, possibly signaling military preparations.
टॅग्स :AmericaअमेरिकाWarयुद्ध