शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:05 IST

Akshaya Tirtiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजन करण्याची प्रथा आहे, त्याचे लाभ आणि विधी जाणून घ्या.

१९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया(Akshay Tritiya 2026) आहे.  हा दिवस साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी इतकेच दान धर्मालाही महत्त्व असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आजच्या दिवशी चैत्रगौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते. तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाक घरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते. 

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला शुभ ग्रहांचा महासंयोग; 'या' ६ राशींना मिळणार अक्षय्य लाभ!

वास्तविक पाहता, पूर्वी आपली आई, आजी, पणजी रोज रात्री स्वयंपाक घर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते, म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे. 

ही पूजा कशासाठी?

शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्न धान्याची उणीव भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे, ज्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्याभोवती रांगोळी काढावी, हळद कुंकू वाहावे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा पुढील श्लोक आवर्जून म्हणावा- 

या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।

हे ही वाचा : अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!

ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही त्याप्रमाणे जे गरजवंत आहेत, त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्यास अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपण भले श्रीमंत नसलो, तरी आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन घास मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला, तर आपला आनंद, समृद्धी, ऐश्वर्य अक्षय्य राहील यात वादच नाही!

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya 2026: Worship the Stove, Secure Annapurna's Blessings!

Web Summary : Akshaya Tritiya 2026 emphasizes stove worship as part of Annapurna Devi's send-off. This ensures continuous food and prosperity. The tradition highlights honoring the kitchen and helping the needy for lasting blessings.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLaxmi Pujanलक्ष्मीपूजन