Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळालेला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार

या जर्सीतील आतापर्यंत कशी राहिलीये त्यांची कामगिरी? यासंदर्भातील खास माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:43 IST

Open in App

आयपीएल २०२६ स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघ ग्रीन जर्सीत मैदानात उतरला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने पाचपैकी चार सामने जिंकले असून लकी जर्सीसह आणखी एक विजय मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. शनिवारी दुपारच्या सत्रातील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्यासमोर टार्गेट सेट करणार आहे. इथं जाणून घेऊयात आरसीबीचा संघ ग्रीन जर्सीत उतरण्यामागचं कारण आणि या जर्सीतील आतापर्यंत कशी राहिलीये त्यांची कामगिरी? यासंदर्भातील खास माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!हिरव्या जर्सीच्या सामन्यांमधील आरसीबीचE विक्रम

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढती आधीही लाल आणि सोनेरी रंगाच्या जर्सीतील RCB संघाने आयपीएलमध्ये हिरव्या रंगातील जर्सीत मैदानात उतरत 'गो ग्रीन'चा संदेश दिला आहे. २०११ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कोची टस्कर्स केरळाविरुद्ध हिरव्या जर्सीत पहिला सामना खेळला होता.  आतापर्यंत १४ सामन्यात ग्रीन जर्सीत मैदानात उतरला आहे. यात पाच सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला असून ८ सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे. एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याचे पाहायला मिळाले होते. 

...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा

ग्रीन जर्सीत परदेशी खेळाडूंचा बोलबाला

RCB ग्रीन जर्सीत मैदानात उतरल्यावर आतापर्यंतच्या  कोणत्याही भारतीय खेळाडूला 'सामनावीर' पुरस्कार मिळालेला नाही. ख्रिस गेल (२०११), एबी डिव्हिलियर्स (२०१६), वानिंदू हसरंगा (२०२२), ग्लेन मॅक्सवेल (२०२३) आणि फिल सॉल्ट (२०२५) हेच आरसीबीचे खेळाडू आहेत ज्यांनी हिरव्या जर्सीमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे.

हंगामसामनाठिकाणनिकालसामनावीर
आयपीएल २०११आरसीबी विरुद्ध कोची टस्कर्स केरळबंगळुरूआरसीबी ९ विकेट्सने जिंकला ख्रिस गेल)
आयपीएल २०१२आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्सबंगळुरूआरसीबी ५ विकेट्सने हरला अंबाती रायडू
आयपीएल २०१३आरसीबी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबबंगळुरूआरसीबी ७ विकेट्सने हरलाॲडम गिलख्रिस्ट 
आयपीएल २०१४आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सबंगळुरूआरसीबी ८ विकेट्सने हरला एम. एस. धोनी 
आयपीएल २०१५आरसीबी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सबंगळुरूनिकाल नाही-
आयपीएल २०१६आरसीबी विरुद्ध गुजरात लायन्सबंगळुरूआरसीबी १४४ धावांनी जिंकला एबी डिव्हिलियर्स 
आयपीएल २०१७आरसीबी विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सबंगळुरूआरसीबी ८ विकेट्सने हरला सुनील नारायण 
आयपीएल २०१८आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्सबंगळुरूआरसीबी १९ धावांनी हरला संजू सॅमसन
आयपीएल २०१९आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सबंगळुरूआरसीबी ४ विकेट्सने हरला कागिसो रबाडा
आयपीएल २०२०आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सदुबई (DICS)आरसीबी ८ विकेट्सने हरला ऋतुराज गायकवाड 
आयपीएल २०२२आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबादअबू धाबीआरसीबी ६७ धावांनी जिंकला वानिंदू हसरंगा
आयपीएल २०२३आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्सबंगळुरूआरसीबी ७ धावांनी जिंकला ग्लेन मॅक्सवेल 
आयपीएल २०२४आरसीबी विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सकोलकाताआरसीबी १ धावाने हरला आंद्रे रसेल
आयपीएल २०२५आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्सजयपूरआरसीबी ९ विकेट्सने जिंकला फिल सॉल्ट 

 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : RCB's Green Jersey Record: No Indian Player Wins Man of the Match

Web Summary : RCB dons green jerseys to promote 'Go Green' in IPL. They've won 8 of 14 matches in green, but no Indian player has ever won 'Man of the Match' in this jersey; only foreign players have received the award.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग