IPL स्पर्धेतील गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच नवा इतिहास रचला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियवर RCB चा संघाने विक्रमी शतक साजरे केले. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात घरच्या मैदानात शंभर सामने खेळणारा RCB हा पहिला संघ ठरला आहे.
कमालीचा योग म्हणजे IPL चा पहिल्या हंगामातील पहिला सामना आरसीबी संघाने १८ एप्रिल २००८ रोजी याच मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. बरोबर १९ वर्षांनी RCB चा संघ या मैदानात १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
पहिल्या हंगामापासून IPL स्पर्धेचा भाग असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. KKR नं ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानात आतापर्यंत ९८ सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात हा संघही अनोखे शतक पूर्ण करेल.
आयपीएलमधील पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेच्या घरच्या मैदानात ९५ सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे.
गत हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB संघाने १८ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिले वहिले जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामातही संघ तीच कामगिरी करण्याच्या इराद्याने दमदार कामगिरी करताना दिसत आहे.