शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:40 IST

Parashuram Jayanti 2026: अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंतीदेखील साजरी केली जाते, ज्यांना कोकणचा रक्षणकर्ता म्हणतात; त्यांचे मंदिर खुद्द आदिलशहाने बनवून घेतले होते!

शस्त्र आणि शास्त्रात पारंगत अशी भगवान परशुराम यांची ओळख आहे. अक्षय्य तृतीयेच्या(Akshaya Tritiya 2026) दिवशी त्यांचा जन्म झाला. म्हणून ही तिथी भगवान परशुराम यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या मातृ-पितृ भक्तीचे दाखले आजही दिले जातात. अधर्मीयांविरुद्ध युद्धास उभे ठाकून त्यांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, असे पुराणात वर्णन आहे. याचाच अर्थ त्यांचे केवळ अधर्मी क्षत्रियांशी वैर होते. बाकी ते सज्जनांशी सज्जन आणि दुर्जनांशी दुर्जन होऊनच वागत असत. वैदिक धर्माचा, संस्कृतीचा प्रचार, प्रसार करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. 

Akshaya Tritiya 2026: १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला शुभ ग्रहांचा महासंयोग; 'या' ६ राशींना मिळणार अक्षय्य लाभ!

असे म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामानी समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाना सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भुमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फुट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात.

अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!

मंदिराच्या रचनेमध्ये मुगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी -

एकदा आदिल शहाच्या बेगमची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस केला, की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन, त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरुपपणे किना-याला लागली आणि परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 

आजही परशुरामांच्या कृपेमुळे समुद्रालगतचा समस्त प्रदेश सुखी, समाधानी, संपन्न आहे. म्हणून आजही अक्षय्य तृतीयेपासून तीन दिवस परशुरामाचा उत्सव साजरा केला जातो. आपणही त्यांच्याकडून बळ, बुद्धी, शक्ती, तेज मागुया आणि १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंती(Parashuram Jayanti 2026) साजरी करूया. 

English
हिंदी सारांश
Web Title : Parshuram Jayanti 2026: History of Parshuram Temple on Mahendragiri

Web Summary : Lord Parshuram, born on Akshaya Tritiya, is revered for his knowledge and strength. He created Konkan by pushing back the sea. His temple on Mahendragiri, near Chiplun, features Mughal architectural influences. A legend tells of a Begum who built a dome after Parshuram saved her belongings. The region celebrates his blessings during Akshaya Tritiya.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाkonkanकोकणIndian Festivalsभारतीय उत्सव-सणhistoryइतिहासTempleमंदिर