कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथे एक वर्षापूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो पेट्रोल टाकून जाळण्यात आला होता. मात्र हाडांच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
१९ ऑक्टोबर २०२५ रोजी गौरीबिदानूर जवळील कुरुचालू वन घाटी परिसरात कवटी आणि हाडं सापडली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथून जळालेले कपडे, नथ, साडी व महिलांच्या इतर वस्तू जप्त केल्या. प्राथमिक तपासात हा मृतदेह एका महिलेचा असल्याचं स्पष्ट झालं होतं, परंतु तिची ओळख पटत नव्हती.
पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी बराच काळ प्रयत्न केले, अगदी माहिती देणाऱ्यासाठी बक्षीसही जाहीर केलं होतं, पण यश मिळत नव्हतं. अखेर एका वर्षानंतर तपासात ट्विस्ट आला आणि मृत महिलेची ओळख ५२ वर्षीय नुनाकम्मा अशी समोर आली. त्या तुमकूर जिल्ह्यातील पावगड तालुक्यातील तिप्परायनदुर्गा गावच्या रहिवासी होत्या. त्यांना पती आणि मुलं नव्हती, त्यामुळे त्या आपल्या भावाच्या घरी राहत होत्या.
पुतणी आणि बॉयफ्रेंडचा कट
तपासात असं समोर आलं की, या हत्येमागे मृत महिलेची ३२ वर्षीय पुतणी नागलक्ष्मी आणि तिचा २७ वर्षीय बॉयफ्रेंड अशोक कुमार यांचा हात आहे. अशोक हा आंध्र प्रदेशातील मदाकासिरा येथील रहिवासी आहे. २० सप्टेंबर रोजी आरोपींनी नुनाकम्मा यांना उपचार करण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवलं आणि चिक्कबल्लापूरच्या जंगलात नेऊन त्यांची हत्या केली व मृतदेह तिथेच फेकून दिला.
दागिने आणि पैशांची चोरी
हत्येनंतर दोन्ही आरोपी नुनाकम्मा यांच्या घरी पोहोचले आणि कपाटाचं कुलूप तोडून पैसे आणि दागिने चोरले. इतकंच नाही तर गुन्ह्याच्या चार दिवसांनंतर दोघे पुन्हा घटनास्थळी गेले आणि ओळख मिटवण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळून टाकला. त्यानंतर दोघेही बराच काळ शांत राहिले आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते.
हत्येचं कारण काय?
एक वर्षानंतर पोलिसांनी तपास करून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागलक्ष्मीने केवळ पैसे, दागिने आणि लॉटरीच्या तिकिटांच्या लोभापोटी आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून काकीची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे.
Web Summary : A woman's charred remains, discovered a year ago, led to the arrest of her niece and boyfriend. Greed for money, jewelry, and lottery tickets motivated the pair to murder the woman in Karnataka, later stealing from her home.
Web Summary : एक साल पहले मिले एक महिला के जले हुए अवशेषों से उसकी भतीजी और प्रेमी की गिरफ्तारी हुई। पैसे, गहने और लॉटरी टिकटों के लालच में दोनों ने कर्नाटक में महिला की हत्या कर दी, और बाद में उसके घर से चोरी की।