शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:43 IST

स्थानिक लोक आणि पर्यटक या अनोख्या पक्षाला पाहण्यासाठी मकबरा परिसरात पोहचले. कुणी मोबाईल कॅमेऱ्यात त्याला कैद केले तर काही त्याचे हाव भाव, चाल पाहून दंग झाले

अयोध्या - ऐतिहासिक बहु बेगम मकबरा परिसरात अचानक एक असा पाहुणा नजरेस आला, ज्याला पाहून सगळेच हैराण झालेत. हा पाहुणा कुठलाही सामान्य पक्षी नाही तर तो ऑस्ट्रेलियातील दुर्मिळ इमू पक्षी आहे. विशेष म्हणजे या पक्षाला उडताही येत नाही. त्यामुळे हा अयोध्येत कसा पोहोचला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

या पाहुण्याला पाहण्यासाठी लोकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली. स्थानिक लोक आणि पर्यटक या अनोख्या पक्षाला पाहण्यासाठी मकबरा परिसरात पोहचले. कुणी मोबाईल कॅमेऱ्यात त्याला कैद केले तर काही त्याचे हाव भाव, चाल पाहून दंग झाले. अशाप्रकारे परदेशी पाहुणा पक्षी पाहण्याचा अनुभव निराळा होता. वन विभागाच्या माहितीनुसार, बहु बेगम मकबरा परिसरात इमूंची एक जोडी आढळली आहे. इमू हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि ते शहामृगाच्या प्रजातीतील आहेत. जरी ते उडू शकत नसले तरी त्याचा वेग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच तो जगातील सर्वात रंजक पक्ष्यांपैकी एक ठरतो.

इमू हा जगातील सर्वात मोठ्या उडता न येणाऱ्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. त्याची लांब मान, मजबूत पाय आणि वेगाने धावण्याची क्षमता त्याला अद्भूत बनवते. तो ताशी ५० किलोमीटर वेगाने धावू शकतो आणि गरज पडल्यास पोहूही शकतो. शिवाय त्याच्या खाण्याच्या सवयीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो सर्वभक्षी असून फळे, बिया, गवत, कीटक आणि अगदी लहान प्राणीही खातो. त्याचे आयुष्यमानही खूप कमी असून तो अंदाजे २५ ते ३० वर्षे जगतो. मात्र या संपूर्ण घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अनोखा पक्षी अयोध्येतील या ऐतिहासिक स्थळी कसा पोहोचला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याला कुणी पाळले होते का, की तो कुठूनतरी भटकत आला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, इमू हा मूळचा भारतीय नसल्यामुळे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याचा संरक्षित प्रजाती म्हणून समावेश नाही. विदेशी प्रजातींच्या पक्षांची देखरेख आणि संरक्षणासाठी स्वतंत्र नियम आहेत. वन विभाग सध्या या जोडीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांना कोणतीही इजा होणार नाही याची खात्री करत आहे. या अनोख्या ऑस्ट्रेलियन पाहुण्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तो सुरक्षित राहावा यासाठी त्याची सुरक्षितता आणि योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिक, पर्यटक आणि इन्फ्ल्युन्सरही हा पक्षी येथे कसा आणि कुठून आला याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Flightless Australian Emu Reaches Ayodhya, Baffling Forest Department

Web Summary : A pair of Australian emus, flightless birds native to Australia, were found near Ayodhya's historical site. How they arrived remains a mystery. The forest department is monitoring them, ensuring their safety amidst curious onlookers. The emus' presence raises questions about their origin and journey.
टॅग्स :forest departmentवनविभागAyodhyaअयोध्या