एके काळी आपल्या भेदक गतीने फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करणारा अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरान सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत आहे. एक गंभीर वैद्यकीय आजारामुळे ३८ वर्षीय जादरानला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने रुग्णालयातून शापूरचे काही चिंताजनक फोटो शेअर केले आहेत. त्याने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, जादरान माझ्यासाठी मित्रासारखा आहे आणि तो लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे असं त्याने सांगितले. मात्र हे फोटो प्रसिद्ध झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही जादरानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. जादरानच्या भावाशी बोलून त्याच्या गंभीर प्रकृतीबद्दल आफ्रिदीने माहिती घेतली. जादरान कुटुंबीयांनीही सोशल मीडियावर माहिती शेअर केली. ज्यामुळे परिस्थिती गांभीर्याची असल्याचं समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शापूर जादरानच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची (WBC) संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असून त्यामुळे त्याच्या तब्येतीला धोका निर्माण झाला आहे. परिणामी त्याची प्रकृती अजूनही गंभीर असून उपचाराचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शापूर जादरानचं क्रिकेट कारकिर्द कशी होती?
दरम्यान, शापूरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास शापूर जादरान अफगाणिस्तानच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने २००९ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने एकूण ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात ४४ एकदिवसीय आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. जादरानने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४ बळी घेतले, ज्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/२४ अशी होती. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २७ बळी घेतले, ज्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/४० अशी होती. शापूर जादरानने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या कारकिर्दीत त्याने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि तिलकरत्ने दिलशान यांसारख्या प्रमुख फलंदाजांना बाद करून स्वतःला वेगळेपण सिद्ध केले.
Web Summary : Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran is critically ill and fighting for his life in the ICU. Suffering from a serious medical condition involving drastically low white blood cell count, the 38-year-old's condition is concerning. He played 80 international matches before retiring last year.
Web Summary : अफ़ग़ानिस्तान के पूर्व तेज़ गेंदबाज़ शापूर ज़दरान गंभीर रूप से बीमार हैं और आईसीयू में जीवन के लिए संघर्ष कर रहे हैं। गंभीर बीमारी के चलते, जिसमें श्वेत रक्त कोशिकाओं की संख्या में भारी कमी शामिल है, 38 वर्षीय ज़दरान की हालत चिंताजनक है। उन्होंने पिछले साल रिटायर होने से पहले 80 अंतर्राष्ट्रीय मैच खेले।