शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:13 IST

प्रशासनाकडून जाहीर झालेल्या यादीत ५ व्या क्रमांकावरील एका नावाने ही चर्चा सुरू झाली

सरकारी कार्यालयात जारी होणारे आदेश कायम चर्चेत असतात. कधी कुणाचं नाव चुकतं, कधी टायपिंग चुकते तर कधी भाषेचा असा वापर केला जातो ज्याने वाचणारे हैराण होतात. मध्य प्रदेशातील गुना नगरपालिकेतील एक आदेश सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यामागचं कारण एखादा मोठा प्रशासकीय निर्णय नाही तर एक असं नाव, ज्याने सोशल मीडियात बरेच मीम्स व्हायरल होत आहेत.

देशात सगळीकडे जनगणनेची तयारी सुरू आहे. त्यातच एका यादीतील कर्मचाऱ्याचे नाव ऐकून लोक आधी हैराण झाले अन् त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. या यादीत एका कर्मचाऱ्याचं नाव Girlfriend Pant असं छापण्यात आले आहे. ज्यामुळे प्रशासनाच्या प्रक्रियेवर आणि सोशल मीडियात विनोदी शैलीने अनेकांनी याची खिल्ली उडवली आहे.

गुना नगरपालिकेच्या जनगणना २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील तयारीसाठी एकूण ३६ कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली होती. त्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केला होता. १७ ते १९ एप्रिल कालावधीत हा कार्यक्रम गांधी कॉलेजमध्ये होत आहे. या कार्यक्रमातील अधिकृत यादीत ज्यात सर्व कर्मचाऱ्यांची नावे, पद आणि त्यांच्या कामाचे स्वरुप लिहिले आहे. सामान्यत: हा प्रशासकीय कामाचा एक भाग असतो. त्यामुळे त्यात शक्यतो चूका होणार नाही याची दक्षता घेतली जाते. 

आता 'गर्लफ्रेंड' जनगणना करायला घरी येणार

प्रशासनाकडून जाहीर झालेल्या यादीत ५ व्या क्रमांकावरील एका नावाने ही चर्चा सुरू झाली. या कर्मचाऱ्याचे नाव GirlFriend Pant असं लिहिले होते. त्याशिवाय त्याच्या यूजर आयडीतही Girlfriend शब्दाचा वापर केला होता. सरकारी कागदपत्रात असा शब्द वापरल्याने लोक हैराण झाले. जेव्हा ही यादी सोशल मीडियात व्हायरल झाली तेव्हा लोकांनी विविध प्रतिक्रिया देणे सुरू केल्या. त्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकाराची पडताळणी केली तेव्हा या कर्मचाऱ्याचे खरे नाव प्रेमिका पंत असल्याचे समोर आले. एखाद्या नावाचे इंग्रजीत ट्रान्सलेट करून चुकीच्या पद्धतीने GirlFriend छापण्यात आल्याचं उघड झाले. परंतु सोशल मीडियात हे नाव चर्चेचा विषय बनले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Municipality's Census Order: 'Girlfriend' to Visit Homes; Memes Go Viral

Web Summary : A municipality in Guna, Madhya Pradesh, listed an employee as 'Girlfriend Pant' for census duty, sparking amusement and memes online. The actual name was Premika Pant, mistranslated into English, causing a social media frenzy.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल