मुंबई - मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी शनिवार मध्यरात्रीपासून १० तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन धीमी लोकल सीएसएमटी-खोपोली ही रात्री १०.२८ वाजता सुटेल, तर अप दिशेतील शेवटची कसारा-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री ११.१५ वाजता धावेल.
ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ तसेच डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येतील.
कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२ व रविवारी पहाटे ३.२३ ते सकाळी ९.५५ दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच परळ, विद्याविहार व सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्यांनाही (रात्री १०.४९ ते पहाटे १२.१२ आणि सकाळी ४.४५ ते ९.०५) जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान काही जलद लोकल गाड्यांना दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात येतील. तसेच सर्व लोकल गाड्या सरासरी १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉकपश्चिम आणि हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पनवेल/बेलापूर दरम्यानच्या सेवा रद्द असणार आहेत, तर ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ या वेळेत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत ठाणे-पनवेल लोकल बंद राहतील. सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.
सांताक्रुझ - गोरेगावच्या दरम्यान जलद मार्ग बंदपश्चिम रेल्वेकडून सांताक्रुज आणि गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व जलद लोकल धिमी मार्गावर वळवण्यात येतील, तर काही लोकल रद्द राहतील, तर काही बोरीवली व अंधेरी लोकल गोरेगावपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.
Web Summary : Central Railway will have a 10-hour block for platform extensions at Thane and Dombivli. Harbour and Western lines also face mega blocks, causing delays and cancellations. Expect disruptions.
Web Summary : ठाणे और डोंबिवली में प्लेटफॉर्म विस्तार के लिए मध्य रेलवे पर 10 घंटे का ब्लॉक रहेगा। हार्बर और पश्चिमी लाइनों पर भी मेगा ब्लॉक, जिससे देरी और रद्द होने की संभावना है।