शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 23:09 IST

Iran stops Indian ships Hormuz 2026: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारी १४ जहाजे अडवून गोळीबार केला. भारताच्या तेल पुरवठ्यावर संकट असून, ओमानजवळ कंटेनर जहाजावरही हल्ला झाला आहे.

मध्य-पूर्वेतील होर्मुझ खोलल्याचे जाहीर करून काही तास उलटत नाही तोच पुन्हा इराणने भारतीय जहाजांचा जथ्था रोखून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अशातच गॅस आणि कच्चे तेल घेऊन भारताकडे निघालेली ही जहाजे पुन्हा माघारी गेली परंतू या धावपळीत एक जहाज इराणी नौदलाच्या डोळ्यात धूळ फेकत होर्मुझ पार करून निसटले आहे. 

कच्चे तेल, गॅस आणि खते घेऊन भारताकडे निघालेल्या १४ जहाजांच्या ताफ्याला इराणच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत रोखले होते. १४ जहाजांचा ताफा रांगेत जात असताना इराणच्या गनबोट्सनी ताफ्यातील दोन जहाजांवर विना इशारा गोळीबार केला. पीटीआय नुसार, एका भारतीय जहाजाच्या खिडकीला गोळी लागून काच फुटली, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

या हल्ल्यानंतर ताफ्यातील १३ जहाजांनी आपला मार्ग बदलून पर्शियन आखातात परतण्याचा निर्णय घेतला. केवळ एक जहाज ही सामुद्रधुनी ओलांडण्यात यशस्वी झाले. 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' यांसारख्या भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले. एका जहाजाने आपली ओळख पटवण्यासाठी रेडिओवर संदेशही प्रसारित केला होता. या जहाजांना इराणने परवानगी देखील दिली होती, परंतू नंतर गोळीबार करून परत माघारी पाठविले. आता यापैकी सात भारतीय जहाजे सध्या इराणच्या 'लारक' बेटाजवळ इराणच्या परवानगीच्या प्रतीक्षेत उभी आहेत.

होर्मुझमध्ये दुसरा मोठा हल्लाभारतीय जहाजांवरील हल्ल्यानंतर काही तासांतच ओमानच्या किनाऱ्यापासून ४६ किमी अंतरावर एका कंटेनर जहाजावर अज्ञात 'प्रोजेक्टाईल'ने हल्ला झाला. यामध्ये काही कंटेनर्सचे नुकसान झाले असून, यामुळे सागरी वाहतुकीसाठी हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे.

काही काळ मार्ग खुला, मग पुन्हा बंदीइराणने सुरुवातीला 'गुडविल' म्हणून १० दिवसांच्या युद्धविराम काळात हा मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी खुला केल्याचे जाहीर केले होते. यादरम्यान ८ तेल आणि गॅस टँकर या मार्गावरून सुखरूप बाहेर पडले. मात्र, अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी सुरूच ठेवल्यामुळे इराणने संतापून पुन्हा एकदा हा मार्ग बंद केला आणि कडक लष्करी नियंत्रण लागू केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iranian Navy Fires on Indian Ships in Hormuz Strait: Update

Web Summary : Iranian forces fired on Indian ships in Hormuz, damaging one. Thirteen ships retreated, but one escaped. Seven await permission near Larak Island. A container ship was also attacked nearby, raising maritime safety concerns. Iran initially opened the route then closed it again.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धFuel Crisisइंधन टंचाई