Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट

 संजूची DRS ची खेळी अन् CSK नं अभिषेक नावाच्या वादळाला रोखलं

By सुशांत जाधव | Updated: April 18, 2026 22:43 IST

Open in App

IPL 2026 SRH vs SRH Sanju Samson Force Ruturaj Gaikwad For DRS Abhishek Sharma Wicket : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २७ वा सामना खेळवण्यात आला. ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मानं तुफान फटकेबाजी करत त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरवला. ट्रॅविस हेडच्या साथीनं त्याने अवघ्या ३५ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार सलामी दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 संजूची DRS ची खेळी अन् CSK नं अभिषेक नावाच्या वादळाला रोखलं

पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात मुकेश चौधरी याने ट्रॅविस हेड २३ (२०) आणि ईशान किशन ०(१) यांना लागोपाठ तंबूचा रस्ता दाखवत चेन्नई सुपर किंग्सला दिलासा दिला. पण वादळी खेळी करणाऱ्या अभिषेकला कोण  रोखणार? हा मोठा प्रश्न चेन्नई सुपर किंग्ससमोर होता. त्याला रोखण्यासाठी संजू रिव्ह्यू सिस्टीम कामी आली. अभिषेक शर्माच्या विकेटसाठी ना गोलंदाजाने अपील केली ना पंचाला काही कळलं, पण संजूनं आत्मविश्वासानं कर्णधार ऋतुराज गायकवाडला रिव्ह्यू घेण्यास मनवले अन् अभिषेकची विकेट मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक

संजूला साथ देत ऋतुराजनं रिव्ह्यू घेतला अन् पंचांनी निर्णय बदलला

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं आयपीएल कारकिर्दीतील आपले जलद अर्धशतक झळकावले. तो ही खेळी त्याच तोऱ्यात पुढे नेण्याच्या इराद्याने खेळत होता. जेमी ओव्हरटन घेऊन आलेल्या आठव्या षटकात त्याने थर्ड मॅनच्या दिशेनं फटका खळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू बॅटची कड घेऊन संजूच्या हातात विसावला. संजूनं आत्मविश्वसाने विकेट मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. पण ना गोलंदाजाने अपील केली ना पंचांनी अभिषेकला आउट दिले. मग संजू कर्णधार ऋतुराजला रिव्ह्यूसाठी मनवले. रिप्लेमध्ये चेंडू अभिषेकच्या बॅटची हलकी कड घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले अन् मैदानातील पंचांनी आपला निर्णय बदलत तो आउट असल्याचे घोषित केले. 

संजूचा आत्मविश्वास MS धोनीची आठवण करून देणारा

MS धोनी यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससोबत असला तरी अद्यापही तो मैदानात उतरलेला नाही. दुखापतीतून सावरुन तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक करेल, अशी आशा होती. पण यावेळीही CSK चा संघ त्याच्याशिवायच मैदानात उतरला. तो मैदानात नसला तरी संजूच्या यशस्वी रिव्ह्यूमध्ये MS धोनीची झलक दिसून आली. धोनीनं रिव्ह्यू घेतला म्हणजे विषय संपला, असे चित्र क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा अनुभवले आहे. त्यामुळे DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम असेही संबोधण्यात आले. अगदी तिच झलक संजूनं दाखवून दिली. हे चित्र तो CSK च्या ताफ्यातून धोनीचा वारचा जपण्यासाठी तयार असल्याचे चित्र निर्माण करणारा होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson's Dhoni-esque Review Secures Crucial Wicket for CSK Against SRH

Web Summary : Sanju Samson's sharp instincts and a successful DRS review, reminiscent of MS Dhoni, helped CSK secure the crucial wicket of Abhishek Sharma against SRH. Samson convinced Ruturaj Gaikwad to take the review after he noticed an edge, leading to the dismissal and breaking Sharma's momentum.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्ससंजू सॅमसनअभिषेक शर्माऋतुराज गायकवाड