लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: घरात बसून आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही. त्यासाठी गावागावांत जाऊन कष्टकरी, शेतकरी, वारकरी व गरिबांसाठी काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. नाव किंवा आडनाव नाही तर कुवत महत्त्वाची आहे. तहान-भूक विसरून काम करा. लोकांचे अश्रू पुसा. जिथे संकट, तिथे शिवसेना ही कार्यपद्धती युवासेनेने स्वीकारावी. करा जिद्द आणि उडवा विरोधकांची दैना, शिवसेनेच्या यशात पुढे असेल युवासेना, असा संदेश शिंदेसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी युवासैनिकांना दिला.
वरळी डोम येथे शिंदेसेनेच्या युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा (महायुवोत्सव) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी शिंदेसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक निवडणुकीत जनतेच्या न्यायालयाने असली शिवसेना कोणती ते सिद्ध केले. पण, आता निवडणुकांचा सिझन संपला असून, संघटन बांधणीचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे घर तिथे शिवसैनिक अभियान राबवून पक्ष वाढविण्याचे काम युवासेनेला करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
युवासेना ही संघटना चांदा ते बांदापर्यंत पोहोचायला हवी. उद्याचा युवा महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकांशी संवाद साधावा. युवकांना प्रशिक्षित करणे त्यांना नोकऱ्या, व्यवसाय देण्याचे काम करा. तहान भूक विसरून मेहनत घेतल्यास पदे मागे चालत येतील. देशात ६५ टक्के लोक ३५ वर्षांखालील असल्याने तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे. १३ वर्षांत एकही सुटी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श ठेवा. त्यांच्यासारखीच जिद्द, जोश युवासेनेत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच महिला आरक्षणात खोड घालणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे शिंदे म्हणाले.
कर्तुत्वाचा गौरव
महायुवोत्सव मेळाव्यात रेड सॉईल स्टोरी युट्यूब चॅनेलच्या निर्मात्या पूजा गवस, परभणीतील संघर्ष करिअर अकादमीचे शिक्षक शिवानंद कुंभार, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयपीएस झालेले बिरदेव सिद्धपा डोणे, भाजी विक्रेत्याचा मुलगा ते व्हीजनरी कन्टेनर असा प्रवास करणे सिद्धेश लोकरे, बीच प्लीज इंडिया संस्थेचे संस्थापक व पर्यावरणप्रेमी मल्हार कळंबे यांना शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
Web Summary : Eknath Shinde urged Yuva Sena to work selflessly for the people, emphasizing action over mere political maneuvering. He stressed connecting with the youth, creating jobs, and following Narendra Modi's dedication. The Mahayuvotsav event also honored individuals for their exceptional achievements.
Web Summary : एकनाथ शिंदे ने युवा सेना से लोगों के लिए निस्वार्थ भाव से काम करने का आग्रह किया, और केवल राजनीतिक पैंतरेबाज़ी पर कार्रवाई पर जोर दिया। उन्होंने युवाओं से जुड़ने, नौकरियाँ पैदा करने और नरेंद्र मोदी के समर्पण का पालन करने पर बल दिया। महायुवोत्सव कार्यक्रम में व्यक्तियों को उनकी असाधारण उपलब्धियों के लिए सम्मानित किया गया।