शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 02:15 IST

देशात घातपात कारवाया करण्याचा कट आखणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना मुंबई, ठाणे, ओडिशा आणि बिहार येथून अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, ओडिशा आणि बिहार येथून चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी देशात घातपाती कारवाया करण्याचा कट आखला होता. यातील दोन आरोपी हे गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी आयईडी बसवलेली रिमोट-नियंत्रित खेळण्याची कार तयार करत होते.

मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इमरान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते ‘गझवा-ए-हिंद’सारख्या संकल्पनांचा प्रचार करत होते. ते ‘एन्क्रिप्टेड’ सोशल मीडिया गटांवर सक्रिय होते. 

एक आरोपी मुंबईचा, दुसरा ठाणे येथील रहिवासी

मोसैब अहमद हा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील रहिवासी असून, तो दहावीपर्यंत शिकला आहे. तो ठाण्यातील ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये काम करत होता. मोहम्मद हम्माद हा मुंबईचा रहिवासी असून, तो बहि:शाल पद्धतीने बारावीचे शिक्षण घेत आहे.  शेख इमरान हा ओडिशातील असून, तो दहावीपर्यंत शिकला आहे. तो सुरक्षारक्षक आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मोहम्मद सोहेल हा बिहारमधील कटिहारचा रहिवासी असून, तो व्यवसायाने प्लंबर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Terror plot foiled using toy car; Four suspects arrested.

Web Summary : Delhi Police arrested four suspects from Mumbai, Thane, Odisha, and Bihar for plotting attacks. Two were building a remote-controlled toy car with IEDs for crowded areas. Suspects promoted extremist ideologies on encrypted social media.
टॅग्स :terroristदहशतवादीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईthaneठाणेBiharबिहार