लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर/देवगाव: कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो, घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो, असे सांगून लोकांची फसवणूक करणारा व पैसे उकळणारा संगमनेर तालुक्यातील भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याला पोलिसांनी गजाआड केले.
या बाबासोबत डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगाव पान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे (दोघेही रा. रहिमतपूर, ता. संगमनेर) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी बाबाचे युट्यूब चॅनेलवरचे अंधश्रद्धामूलक व्हिडीओ, तसेच बाबाने गवांदे यांचेसह पोलिसांविरोधात खंडणीबाबतचे बदनामीचे जे व्हिडीओ बनविले तेही पुरावा म्हणून दिले आहेत.
शुक्रवारी (दि. १७) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली. या बाबाने ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनेल स्वत:च्या जाहिरातीसाठी सुरू केले होते. त्यावरील व्हिडीओमध्ये दुर्धर आजार बरे करण्याचे दावे तो करत होता. लोकांकडून ११ हजार, २१ हजार, ५१ हजार अशा रकमा तो घेत होता. माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, असे भासवून त्याने आसपासच्या परिसरात दहशत निर्माण केली आहे, असेही गवांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Web Summary : A fake baba in Sangamner, claiming divine powers to cure diseases like cancer and grant children, was arrested. He allegedly defrauded people, extorting money with false promises. Police arrested him and an accomplice after a complaint by an anti-superstition activist, who provided evidence from his YouTube channel.
Web Summary : संगमनेर में कैंसर जैसे रोगों को ठीक करने और बच्चे देने का दावा करने वाले एक ढोंगी बाबा को गिरफ्तार किया गया। उस पर झूठे वादों से लोगों को ठगने और पैसे ऐंठने का आरोप है। पुलिस ने अंधविश्वास विरोधी कार्यकर्ता की शिकायत के बाद उसे और एक साथी को गिरफ्तार किया।