India Iran News: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करत या जलमार्गावर कडक निर्बंध लादले. या तणावपूर्ण वातावरणात इराणच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. यानंतर आता इराणच्या भारतातील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचे मालवाहतूक जहाज 'जग अर्णव' व तेलवाहू जहाज 'सनमार हेराल्ड' हे ओमानच्या ईशान्येला २५ सागरी मैलावर असताना या इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गाईस'ने 'या जहाजांना मार्ग बदलण्यास सांगितले. त्या दरम्यान जहाजावर गोळीबार झाल्याची शक्यता आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या गंभीर घटनेची दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांना तातडीने समन्स बजावले. यानंतर आता भारतातील इराणचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि इराणमधील संबंध खूप घट्ट
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना भारतातील इराणचे सर्वोच्च प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही म्हणाले की, भारत आणि इराणमधील संबंध खूप घट्ट आहेत. मात्र, होर्मुझमधील गोळीबाराबद्दल आपल्याला माहिती नाही. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि या प्रकरणावर तोडगा निघेल. आम्हाला हे युद्ध नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे आणि आम्हाला आशा आहे की समोरची बाजू शांततेचा मार्ग स्वीकारेल, जेणेकरून आपण एक शांततापूर्ण प्रदेश निर्माण करू शकू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, 'जग अर्णव' आणि 'सनमार हेराल्ड' या दोन जहाजांना इराणच्या रिव्होल्युशनरी गाईसने प्रवेश नाकारला आणि त्यांना आपले मार्ग बदलण्याचे आदेश दिले. 'मरीन ट्रॅफिक'च्या ट्रॅकिंग डेटानुसार, ही जहाजे ठरलेल्या मार्गावरून जात असताना लारक बेटाजवळ त्यांचा वेग मंदावला आणि त्यानंतर त्यांनी 'यू-टर्न' घेतला. ईशान्येला २५ सागरी मैल त्यानंतर ही जहाजे ओमानच्या समुद्रात असताना त्यांच्यावर इराणच्या गन बोटीतून गोळीबार झाला. 'सनमार हेराल्ड'ची खोली २१ मीटर आहे. याचा अर्थ हा टैंकर तेलाने पूर्णपणे भरलेला आहे. ब्रिटन लष्कराने (यूकेएमटीओ) टँकरवर गोळीबार झाल्याचे सांगितले.
Web Summary : Iran responded after its navy allegedly fired on two Indian ships in the Hormuz Strait. Iranian officials expressed hope for a peaceful resolution and denied prior knowledge of the incident, emphasizing strong India-Iran relations.
Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में ईरानी नौसेना द्वारा कथित तौर पर दो भारतीय जहाजों पर गोलीबारी के बाद ईरान की प्रतिक्रिया आई है। ईरानी अधिकारियों ने शांतिपूर्ण समाधान की उम्मीद जताई और घटना की जानकारी से इनकार किया, साथ ही भारत-ईरान संबंधों पर जोर दिया।