Petrol Diesel Price : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज (रविवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. महत्वाचे म्हणजे, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटची दरवाढ २०२२ मध्ये केली होती. मात्र, दुसरीकडे खाजगी तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली आहे. १ एप्रिल रोजी खाजगी कंपनी 'शेल इंडिया'ने पेट्रोलच्या दरात ७.४ रुपये प्रति लीटर आणि डिझेलमध्ये २५ रुपये प्रति लीटर, अशी वाढ केली. या वाढीनंतर शेल इंडियाचे पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तसेच, पॉवर पेट्रोलही १२९.८५ रुपये तर प्रीमियम डिझेल १३३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.
नायरानेही वाढवले आहेत भाव - मार्च महिन्यात 'नायरा' या खाजगी तेल कंपनीनेही इंधन दरात मोठी वाढ केली. मध्य पूर्वेतील तणावामुळे कंपनीने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपयांनी महाग केले होते. त्यानंतर किमती स्थिर आहेत.
याशिवाय, इंडियन ऑईलने १ एप्रिल रोजी XP100 या प्रीमियम पेट्रोलच्या दरात ११ रुपयांची वाढ केली. ते १६० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर प्रीमियम डिझेल दर वाढीनतंर ९२.९९ रुपयांवर पोहोचले आहे.
देशातील काही प्रमुख शहरांतील आजचे दर -पेट्रोल -दिल्ली : ९४.७७ रुपये
कोलकाता : १०४.२१ रुपये
हैदराबाद : ९४.४९ रुपये
पुणे : १०४.०४ रुपये
चेन्नई : १००.७५ रुपये
अहमदाबाद : ९४.४९ रुपये
बेंगळुरू : १०२.९२ रुपये (मूळ माहितीतील १०२९२ मध्ये दुरुस्ती)
नाशिक : ९५.५० रुपये
लखनौ : ९४.६९ रुपये
चंदीगड : ९४.३० रुपये
इंदूर : १०६.४८ रुपये
पटना : १०५.५८ रुपये
सुरत : ९५.०० रुपये
डिझेलचे -दिल्ली : ८७.६७ रुपये
अहमदाबाद : ९०.१७ रुपये
पुणे : ९०.५७ रुपये
जयपूर : ९०.२१ रुपये
लखनौ : ९०.५७ रुपये
कोलकाता : ९०.७६ रुपये
चेन्नई : ९२.३४ रुपये
हैदराबाद : ९५.७० रुपये
चंदीगड : ८२.४५ रुपये
इंदूर : ९१.८८ रुपये
पटना : ९३.८० रुपये
सुरत : ८९.०० रुपये
नाशिक : ८९.५९ रुपये
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणआंतरराष्ट्रीय बाजारात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले होते. मात्र, आता हे दर १०० डॉलरच्या खाली आले आहेत. इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून टँकर जाऊ देण्याचे संकेत दिल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ही घसरण बघायला मिळत आहे.
Web Summary : Private oil firms like Shell & Nayara hiked petrol, diesel prices. Shell's petrol reached ₹119.85, diesel ₹123/liter. Indian Oil raised XP100 price. Crude oil prices are declining globally. Public sector firms rates unchanged.
Web Summary : शेल और नायरा जैसी निजी तेल कंपनियों ने पेट्रोल, डीज़ल के दाम बढ़ाए। शेल का पेट्रोल ₹119.85, डीज़ल ₹123/लीटर हुआ। इंडियन ऑयल ने XP100 का दाम बढ़ाया। कच्चे तेल की कीमतें गिर रही हैं। सरकारी कंपनियों के दरें अपरिवर्तित।