Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 09:34 IST

तब्बूच्या आधी 'या' अभिनेत्रीनेही घेतलाय फ्लॅट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूनेमुंबईत एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली असून, तिच्या या नवीन घराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'लियासेस फोरस'नुसार, तब्बूनेमुंबईच्या उच्चभ्रू वर्सोवा परिसरातील 'गोदरेज स्कायशोर' या इमारतीत हे नवीन घर विकत घेतले आहे. सुमारे २,१५३ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या अपार्टमेंटची नोंदणी २६ मार्च २०२६ रोजी करण्यात आली आहे. या फ्लॅटची किंमत किती माहितीये का?

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट देणारी तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. ५४ वर्षांची तब्बू आजही अविवाहित आहे. नुकत्याच मुंबईत केलेल्या नवीन फ्लॅट खरेदीसाठी तब्बूने ५.२४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. अपार्टमेंटसोबतच तिला दोन कार पार्किंग स्लॉट देखील मिळाले आहेत. हे घर २,१५३ चौरस फुटांचे असून, त्यामध्ये १२७ चौरस फुटांच्या बाल्कनीचाही समावेश आहे. तब्बूने ही गुंतवणूक ज्या 'गोदरेज स्कायशोर' प्रकल्पात केली आहे, तो २७,००० चौरस फुटांहून अधिक जमिनीवर साकारला जात असून त्यात एकूण २४ मजले आणि १२६ निवासी सदनिका असतील. तब्बूने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत १-२ कोटी नव्हे तर तब्बल १० कोटी आहे. 

आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तब्बू 'मकबूल', 'हैदर' आणि 'अंधाधुन' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या तब्बूची एकूण संपत्ती सुमारे २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनयासोबतच ती आता रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री गौहर खान हिने देखील याच परिसरात १०.१३ कोटींचे तीन अपार्टमेंट्स खरेदी केले होते.

मुंबईतील अंधेरी (पश्चिम) मधील वर्सोवा हा परिसर बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. या भागातून व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्रातील ठिकाणांकडे जाणे सोपे पडते, तसेच येथे मेट्रोसह सर्व वाहतूक सुविधा उत्तम आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारखे मोठे स्टार्स जुहू आणि वांद्रे परिसरात राहत असले, तरी वर्सोवा, लोखंडवाला आणि खार या भागांतही सध्या अनेक सेलिब्रिटी आपली घरे खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tabu Buys Luxurious ₹10 Crore Flat in Mumbai's Versova

Web Summary : Tabu purchased a ₹10 crore, 2,153 sq ft apartment in Versova's 'Godrej Skyshore', registered in March 2026. The flat includes two parking spots. Versova is a celebrity hotspot due to its connectivity and amenities.
टॅग्स :तब्बूबॉलिवूडमुंबईसुंदर गृहनियोजन