Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:08 IST

Deepika Padukone Second Pregnancy: दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दीपिका पादुकोण पुन्हा प्रेग्नंट

अभिनेता रणवीर सिंह सध्या 'धुरंधर'चं यश एन्जॉय करत आहे. दरम्यान आता रणवीरच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाने स्वत: इन्स्टाग्रामवर प्रेग्नंसी किटचा फोटो शेअर करत दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिकाने लेकीला जन्म दिला होता. आता दीड वर्षातच ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.  रणवीर, दीपिका आणि दुआवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दीपिका पादुकोणने अगदी गोड अंदाजात दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली. लेक दुआच्या हातात प्रेग्नंसी किट असतानाचा फोटो तिने शेअर केला आहे. दुआ मोठी ताई होणार असंच ती सांगत आहे. रणवीर आणि दीपिकाने मिळून इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. यासोबत दीपिकाने कॅप्शनमध्ये नजर लागू नये असं सांगणारे दोन एव्हिल आय इमोजी टाकले आहेत. 

दीपिकाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहते मंडळी 'दीपवीर'चं अभिनंदन करत आहेत. 'धुरंधर २' येतोय' अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे. परिणिती चोप्रा, समंथा, भूमी पेडणेकर, मनीष पॉल, अमृता खानविलकर अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत अभिनंदन केलं आहे. रणवीर आणि दीपिका २०१८ साली लग्नबंधनात अडकले. दोघांनी 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' सारखे हिट सिनेमे दिले. २०२४ साली दीपिकाने मुलीला जन्म दिला आणि आता पुन्हा त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे.

 लवकरच प्रसिद्ध पॉवर कपल दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा करणार अशी चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती. अनेकांनी रणवीर-दीपिकाचा अंदाज लावला होता जो खरा ठरला आहे. त्यामुळे पादुकोण आणि सिंह कुटुंबात आनंदाला उधाण आलं आहे. 'धुरंधर'चं यश रणवीर सिंहच्या आयुष्यात मोठं 'लक' घेऊन आलं आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण Atlee दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन स्टारर 'राका' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती अॅक्शन सीन्स करणार आहे. याआधी पहिल्या प्रेग्नंसीनंतर दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याने तिला दोन बिग बजेट सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे 'राका' सिनेमाचं काय होणार असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer and Deepika announce second pregnancy with adorable photo!

Web Summary : Ranveer Singh and Deepika Padukone are expecting their second child. Deepika shared the news with a cute photo featuring their daughter Dua. The couple received congratulations from fans and celebrities. Deepika will be seen in 'Raaka' soon.
टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगप्रेग्नंसीबॉलिवूड