Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians Viral Video IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात सलामीचा सामना जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण त्यानंतर पुढील सलग चार सामन्यात मुंबईचा पराभव झाला. पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाची फिल्डिंग अतिशय खराब झाली. मोक्याच्या क्षणी त्यांनी तीन महत्त्वाचे झेल सोडले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना १९६ धावांच्या बड्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला यंदाच्या हंगामात अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. याचदरम्यान, संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बुमराहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपासून मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सारेकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच हार्दिक आणि बुमराह यांचा मैदानावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लढवले होते. तशातच आता हॉटेलच्या बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आधी बुमराह काही लोकांसोबत बाहेर येतो. त्यावेळी काही तरुण फॅन्स त्याच्या जवळ जातात आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढू लागतात. बुमराहदेखील त्यांच्यासोबत छान स्माईल करत सेल्फी काढू लागतो. तितक्यात मागून हार्दिक येतो. हार्दिक बुमराहच्या बाजूने पटपट चालत निघून जातो. त्यावेळी हार्दिक बुमराहला फॅन्ससोबत फोटो काढण्यावरून काहीतरी बोलतो.
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? जुना आहे की नवीन आहे? याबाबत फारशी माहिती नाही. परंतु सध्या हार्दिक आणि बुमराह यांच्यात सुरू असलेल्या तथाकथित वादामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या बुमराहला नेमकं काय बोलतो, त्याचा बोलण्यामागचा हेतु काय असतो याची काही स्पष्टता नाही. केवळ सोशल मीडियावर फॅन्स हा व्हिडीओ पाहून व्यक्त होत आहेत.
Web Summary : A video shows Jasprit Bumrah taking selfies with fans when Hardik Pandya walks by, seemingly saying something to him. Amidst rumours of tension within the Mumbai Indians, this video has sparked fan speculation, though the context remains unclear.
Web Summary : एक वीडियो में जसप्रीत बुमराह प्रशंसकों के साथ सेल्फी ले रहे हैं, तभी हार्दिक पांड्या गुजरते हुए उनसे कुछ कहते हुए दिखते हैं। मुंबई इंडियंस के भीतर तनाव की अफवाहों के बीच, इस वीडियो ने प्रशंसकों के बीच अटकलों को जन्म दे दिया है, हालाँकि संदर्भ अभी भी स्पष्ट नहीं है।