Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:31 IST

Akshaya Tritiya Gold Buying: सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Akshaya Tritiya Gold Buying: अक्षय तृतीया हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा सण आहे. आजच्या दिवशी सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. खरेदीपूर्वी सोन्याचे दर, त्याची शुद्धता आणि योग्य पडताळणी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

सोन्याचे ताजे दर (प्रति १० ग्रॅम)

भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार ताजे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • २४ कॅरेट सोनं: ₹१,५१,६६०
  • २२ कॅरेट सोनं: ₹१,४८,०२०
  • २० कॅरेट सोनं: ₹१,३४,९७०
  • १८ कॅरेट सोनं: ₹१,२२,८४०
  • १४ कॅरेट सोनं: ₹९७,८२०

हे दर देशभर समान असले तरी दागिने खरेदी करताना GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे आकारले जातात, त्यामुळे अंतिम किंमत वाढते.

MCX वर सोन्या-चांदीचा ट्रेंड

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला १० ग्रॅम सोनं ₹१,५२,६४२ रुपयांना होतं, तर तेच आठवड्याच्या शेवटी ₹१,५४,६०५ / १० ग्रॅम वर पोहोचला आहे. म्हणजेच, एका आठवड्यात सोन्याचे दर ₹१,९५३ रुपयांनी वाढले. मात्र, सोन्याचा उच्चांक ₹२,०२,९८४ असल्याने, सध्या ते अजूनही सुमारे ₹४८,००० ने स्वस्तच आहेत.

सोनं खरं की, खोटं? तपासण्याचे सोपे उपाय

अक्षय तृतीयेच्या गर्दीत फसवणूक टाळण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा-

१. BIS हॉलमार्क तपासा

९१६ = २२ कॅरेट (९१.६% शुद्ध)७५० = १८ कॅरेट (७५% शुद्ध)५८५ = १४ कॅरेट (५८५5% शुद्ध)

२. आवश्यक मार्किंग तपासा

प्युरिटी कोडटेस्टिंग सेंटर मार्कज्वेलरचा ओळख कोडहॉलमार्क तारीख

३. BIS Care App वापरा

HUID (६ अंकी कोड) टाकून सोन्याची शुद्धता आणि ज्वेलरची माहिती सहज तपासता येते.

आता सोनं खरेदी करणं योग्य का?

अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त असला तरी भावनिक निर्णय घेण्याऐवजी माहितीपूर्ण खरेदी करणे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या सोन्याचा दर ₹१.५० लाखांच्या पुढे असला तरी तज्ञांच्या मते, सोन्याचे दीर्घकालीन फंडामेंटल मजबूत आहेत. एकदम मोठी खरेदी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने (SIP पद्धतीने) गुंतवणूक करावी. दर घसरल्यावर थोडं-थोडं सोनं खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे.

(टीप- या बातमीत फक्त सोन्याच्या दरांविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya Gold Buying: Check rates, purity, and buying tips.

Web Summary : Buying gold on Akshaya Tritiya? Check latest rates from IBJA and MCX. Verify purity using BIS hallmark and app. Consider phased investment amid fluctuating prices. Seek financial advice before investing.
टॅग्स :अक्षय्य तृतीयासोनंचांदीगुंतवणूक