शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pune SSC Exam Paper Leak: पुण्यात दहावीच्या गणित विषयाचे पेपर फुटले; प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:45 IST

पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : पुण्यात दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गणिताच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परीक्षेपूर्वीच गणित ‘एक’ आणि ‘दोन’ हे दोन्ही पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणिताच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या काही दिवस आधीच एका मेसेजिंग ग्रुपवर फिरत असल्याचे समोर आले. काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका शेअर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित माहिती शिक्षण मंडळ आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान ६ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-१’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी त्या ग्रुपवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, ९ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-२’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे तीन दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध असल्याचे आढळून आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कशा प्रकारे बाहेर पडली, तसेच ती सोशल मीडियावर कोणी आणि कशासाठी प्रसारित केली याचा शोध घेतला जात आहे. सायबर तज्ञांचीही मदत घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आवश्यक असल्यास संबंधित पेपर पुन्हा घेण्याबाबत शिक्षण मंडळ निर्णय घेऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune SSC Exam Paper Leaked; Math Paper Circulated on Telegram

Web Summary : Pune's SSC math papers leaked before exams, shared on Telegram. Police investigate the breach, raising concerns about exam security. Re-exam possibility discussed.
टॅग्स :Puneपुणेssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र