अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर, आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी चीनी जनतेसाठी एक खास व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची जबरदस्त स्तुती केली आहे. जिनपिंग हे आपले 'चांगले आणि जुने मित्र' असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
'बीबीसी फारसी सेवा'च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, "रशिया आणि चीनचे संबंध आता एका अभूतपूर्व पातळीवर पोहोचले आहेत. दोन्ही देशांमधील वाढते सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रशिया आणि चीनमधील मजबूत संबंध जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संतुलन राखण्यात मोठी भूमिका बजावत आहेत. दोन्ही देश मिळून अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत आहेत."
...म्हणून महत्वाचा आहे पुतिन यांचा दौरा -
महत्वाचे म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्या नंतर लगेचच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने पुतिन यांच्या या यात्रेला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. व्लादिमीर पुतिन हे १९ आणि २० मे रोजी चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत. हा त्यांचा एकूण २५ वा चीन दौरा असेल, जो दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध अधोरेखित करतो. या दौऱ्यादरम्यान रशिया आणि चीनमध्ये व्यापार, ऊर्जा, सुरक्षा तसेच विविध जागतिक मुद्द्यांवर अनेक महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Following Trump's visit, Putin will visit China, praising Xi Jinping as a 'good and old friend.' Russia-China ties are unprecedented, vital for global balance. The visit highlights deepening cooperation in trade, energy, and security.
Web Summary : ट्रंप के दौरे के बाद, पुतिन चीन जाएंगे और शी जिनपिंग को 'अच्छा और पुराना मित्र' बताएंगे। रूस-चीन संबंध अभूतपूर्व हैं, जो वैश्विक संतुलन के लिए महत्वपूर्ण हैं। यात्रा व्यापार, ऊर्जा और सुरक्षा में बढ़ते सहयोग को दर्शाती है।