Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानातून करण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४ वाजता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाद्वारे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.
जागतिक बाजारपेठेत तेलाचा किंमती वाढल्याने भविष्यातील धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील आपल्या राजकीय सहकाऱ्यांनाही केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विशेष बैठक घेऊन राज्यातील सर्व मंत्र्यांसाठी नियमावली जाहीर केली होती.
अभिवादन स्वीकारत एकनाथ शिंदे यांनी विमान गाठले
एकनाथ शिंदे यांचे मुंबई विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. तर काहींनी त्यांना भेटून आपले निवेदन त्यांच्या हाती दिले. या सर्वांना भेटून त्यांचे अभिवादन स्वीकारत एकनाथ शिंदे यांनी विमान गाठले. केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० ची विशेष आढावा बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. ते स्वतः या बैठकीत सहभागी होणार आहेत. एरवी खासगी विमानाने प्रवास करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवासी विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी तत्काळ ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली. हेलिकॉप्टरने होणारे आपले दौरे कमी केले असून, आता तर खासगी विमानाने प्रवास न करता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे पालन करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत हेच त्यांचा या छोट्याशा कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Web Summary : Deputy CM Eknath Shinde chose a commercial flight to Delhi, responding to PM Modi's fuel conservation call. He previously adopted EV car and reduced convoy size. Shinde attends Swachh Bharat Mission meeting in Delhi, prioritizing public transport over private jets.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पीएम मोदी के ईंधन संरक्षण आह्वान का जवाब देते हुए दिल्ली के लिए वाणिज्यिक उड़ान चुनी। उन्होंने पहले ईवी कार अपनाई और काफिले का आकार कम किया। शिंदे दिल्ली में स्वच्छ भारत मिशन की बैठक में भाग ले रहे हैं, निजी जेट पर सार्वजनिक परिवहन को प्राथमिकता दे रहे हैं।