India squad for Afghanistan Test And ODI Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेवर कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल वनडेसह कसोटी संघाचा कर्णधार असून केएल राहुलला कसोटी संघाचे तर श्रेयस अय्यरकडे वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीच्या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही समावेश असून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोहम्मद शमीच्या नावावर निवड समितीत चर्चा देखील झाली नाही.
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
जसप्रीत बुमराहाला विश्रांती; कसोटी आणि वनडे दोन्ही संघात नव्या चेहऱ्यांना संधी
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अफगाणिस्तानविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याचा वर्कलोड व्यवस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघात काही नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. यात मानव सुथार, हर्ष दुबे, गुरनूर बरार आणि प्रिन्स यादव या खेळाडूंचा समावेश आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा वनडे संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव. गुरनूर ब्रार, हर्ष दुबे
एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल,नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
- एकमेव कसोटी सामना: ६ ते १० जून, मुल्लांपुर (न्यू चंडीगड) –सकाळी ९: ३०
- पहिला वनडे सामना (ODI) : १४ जून, धर्मशाला- दुपारी १: ३० वाजता
- दुसरा वनडे सामना (ODI): १७ जून, लखनौ-दुपारी १:३० वाजता
- तिसरा वनडे सामना (ODI): २० जून, चेन्नई- दुपारी १:३० वाजता
Web Summary : Shubman Gill leads India in Afghanistan Test and ODI series. Shreyas Iyer is ODI vice-captain, KL Rahul for Tests. Kohli, Rohit included in ODI squad. Bumrah rested; new faces get chances.
Web Summary : शुभमन गिल अफगानिस्तान टेस्ट और वनडे सीरीज में भारत का नेतृत्व करेंगे। श्रेयस अय्यर वनडे के उप-कप्तान, केएल राहुल टेस्ट के लिए। कोहली, रोहित वनडे टीम में शामिल। बुमराह को आराम; नए चेहरों को मौका।