शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 19:17 IST

Iran Replied To Donald Trump Warning: चर्चेचा अर्थ शरणागती नव्हे, असे इराणने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे.

Iran Replied To Donald Trump Warning: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होताना पाहायला मिळत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी नियंत्रणावरूनही तणाव कामी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी दुसरीकडे यातून मार्ग निघत नाही. यातच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. काही झाले तरी इराण हा अमेरिकेला शरण जाणार नाही, असे स्पष्ट केले.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, अमेरिकेसोबतच्या चर्चेदरम्यान 'शरणागती पत्करण्याचा' इराणचा कोणताही इरादा नाही. चर्चेचा अर्थ शरणागती नव्हे. इराण पूर्ण सन्मान, अधिकार आणि देशाच्या हक्कांचे संरक्षण करत चर्चेत उतरला आहे. कोणत्याही परिस्थितीत इराण आपल्या लोकांच्या आणि देशाच्या कायदेशीर हक्कांपासून मागे हटणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. 

...तर अमेरिका लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे तयार असेल

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केले होते की, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या सर्वोच्च नेत्यांच्या विनंतीवरून इराणवरील लष्करी हल्ला सध्यापुरता थांबवण्यात आला आहे. कराराबाबत सध्या गंभीर चर्चा सुरू आहे, परंतु जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे तयार असेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. 

दरम्यान, इराणसाठी वेळ संपत आला आहे आणि त्यांना त्वरीत हालचाल करावी लागेल, नाहीतर त्यांच्या हाती काहीच उरणार नाही. वेळ अमूल्य आहे, असे सूचक संकेत ट्रम्प यांनी दिले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी कारवाईचे संकेत दिले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. ट्रम्प यांनी वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांशी इराणवरील भविष्यातील धोरणावर चर्चा केली असून, आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran to America: No Surrender Despite Trump's Warning

Web Summary : Iran's president rebuffed Trump's warning, stating they won't surrender. Negotiations don't mean submission. Iran will defend its rights. Trump threatened military action if negotiations fail, urging Iran to act quickly.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प